✒️भंडारा(पुरोगामी न्युज नेटवर्क)
भंडारा(दि. 3 मार्च):- तालुक्यातील बेला येथील गट क्र. 292/2 मध्ये (जागांवर/ प्लाट) मोठ्या प्रमाणात अवैध मुरूम साठा जमा करण्यात आले आहे. बेला ते भंडारा राष्ट्रीय महामार्गाच्या बाजुला गट क्र 292 /2 येथे प्लाटवर हजारों ब्रास मुरूम साठविण्यात आले आहे ते मुरूम बेकायदेशिरपणे उत्खनन करून पाडण्यात आले आहे.
सदर बेला मंडळ अधिकारी एम. बी. वैदय. हे मुरूम चोरीला आळा बसण्याऐवजी मुरूम चोरीला उत्खनन व्यवसायाला गती देत असल्याचे दिसून येत असल्याने याला पाठबळ बेला सर्कल चे नायक तहसिलदार देत आहे. सदर जमिनिवर गट क्र. 292/2 चे माल धुत यांनी सदर मुरूम रॉयल्टी काढून जास्त ग्रास मुरूम काढणे किंवा शेकडो ग्रास रॉयल्टीच्या नावाखाली हजारो ब्रास मुरूम काढण्याच्या अनुचित प्रकाराने शासनाला लाखो रुपयांच्या चुना लावल्या जात आहे.
प्रशासनाने रॉयल्टी धारकांनी दिलेल्या नियोजित जागेवर जाऊन परवानगी आणि प्रत्यक्ष केलेले उत्खनन याची चौकशी करून कारवाही करण्यात यावी. अन्यथा दहा दिवसात कारवाई न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण करण्यात येईल व संपूर्ण जबाबदारी भंडारा तहसिल कार्यालय यांची राहील. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देण्यात आला.




