✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रह्मपुरी(दि.3मार्च):- चंद्रपूर जिल्हा भाजपा उपाध्यक्ष तसेच पंचायत समितीचे माजी उपसभापती रुई येथील निरुपा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर गोकुलदास बालपांडे यांनी रनमोचन येथील योगिता विनोद दोनाडकर यांच्या घरी जाऊन तब्येतीची विचारपूस करीत अपघातातील जखमी महिलेला आर्थिक मदत दिली.
सविस्तर माहिती नुसार दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी रणमोचन गावातील दोनाडकर परिवार व काही आप्तेष्ट नातेवाईक लाखांदूर तालुक्यातील भागडी गावात नामकरण विधीच्या कार्यक्रमाला मालवाहक मिनीडोरने जात असतांना अचानक ब्रह्मपुरी टिळक नगर येथे मुख्य रस्त्यावर मिनीडोर पलटी होऊन अपघात घडला होता. त्यात बऱ्याच महिला व लहान मुले गंभीर जखमी झाले होते मात्र काही महिलांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली होती.
वेळीच जखमींना ब्रह्मपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले होते त्या प्राथमिक उपचारानंतर पर्याव्यवस्थेनुसार काही जखमींना खाजगी दवाखान्यात तर गंभीर काही महिलांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र योगिता विनोद दोनाडकर या महिलेला गंभीर स्वरूपाचे दुखापत झाली होती गडचिरोलीतील उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती.
मात्र गंभीर स्वरूपाची दुखापत असल्याने ब्रह्मपुरी येथील पेशेट्टीवार हॉस्पिटल मध्ये उपचार केले. मात्र सध्या या महिलेवर चौगान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. त्यांच्या कुटुंबाची हालाकीची परिस्थिती लक्षात घेऊन डॉक्टर जीएम बालपांडे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत रणमोचन येथे येऊन योगिता विनोद दोनाडकर यांच्या कुटुंबीयांची विचारपूस करीत आर्थिक मदत केली. त्यामुळे दोनाडकर कुटुंबियाने त्यांचे आभार मानले आहेत.




