🔹सावळेश्वर येथे ८२ लक्ष रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ
✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
बीड(दि.1मार्च):-ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ग्रामीण जनतेने ८०% ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात दिल्या, सत्ता नसली तरीही या सर्व ग्रामपंचायतीनां भरघोस निधी उपलब्ध करून देत आहोत. सत्ता नसली तरीही विकास कामांचा यज्ञ सुरू राहील, मात्र येणाऱ्या काळात जि. प. व पं. स.च्या निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे जेणेकरून पुढच्या काळात यापेक्षाही मोठ्या प्रमाणावर विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देता येईल असे प्रतिपादन विजयसिंह पंडित यांन केले. मौजे सावळेश्वर येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ करताना ते बोलत होते.
गेवराई तालुक्यातील मौजे सावळेश्वर येथे जल जीवन मिशन अंतर्गत ५८ लक्ष रुपयांच्या पाणीपुरवठा योजना आणि २४ लक्ष ८० हजार रुपयांच्या ग्रामपंचायत भवन इमारतीच्या कामाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, दैठणचे सरपंच प्रतापसिंह पंडित, जय भवानीचे संचालक नंदू गोर्डे, सोसायटी चेअरमन भाऊसाहेब शिंदे, बंडू नाना गोर्डे, पांचाळेश्वरचे सरपंच धनंजय शेळके, सावळेश्वरचे सरपंच अशोक सुखदेव, उपसरपंच शिवाजी उधे यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना विजयसिंह पंडित म्हणाले की, सदरील दोनही कामे लवकरात लवकर दर्जेदार पद्धतीने पूर्ण होतील. ही ग्रामपंचायत नव्याने ताब्यात आल्यानंतर एक कोटी रुपयां पर्यंतच्या विकास कामांचा निधी कुठलीही सत्ता नसतांना उपलब्ध करून दिला आहे. या निधी मधून दर्जेदार कामे व्हावीत याची काळजी ग्रामस्थांनी घ्यावी असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाला मुकेश कुटे, सुशील उधे, संदीप डाके, हनुमान कुटे, परमेश्वर कुटे, राजेंद्र डाके, प्रसाद उधे, अजय उधे, अभिषेक उधे, सिद्धार्थ डाके, विक्रम उधे, संदीप कोळी, बदाम कपाटे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाणी पुरवठा योजना व ग्राम पंचायत ईमारत उपलब्ध होणार असल्यामुळे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.




