✒️सिद्धार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड (दि. 28 फेब्रुवारी):-गोपिकाबाई सीताराम गावंडे वरिष्ठ महाविद्यालय उमरखेडचे राष्ट्रीय सेवा योजना निवासी विशेष शिबीर दत्त ग्राम नागेशवाडी येथे दि. 26 /02/2023 ते दि.04/ 03/ 2023 या दरम्यान सात दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.दि. 27/ 02/ 2023 रोजी राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबीर उद्घाटनाचा कार्यक्रम थाटात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ. माधवराव बा. कदम हे होते तर उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सौ. पुण्यरथा विठ्ठल नगारे (स.शिक्षिका) जि. प. प्राथ. मराठी शाळा नागापूर ( रु.) उमरखेड तसेच प्राणीशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. डी व्ही तायडे हे उपस्थित होते.
दत्त ग्राम नागेशवाडी येथील येथील निवासी विशेष शिबीर यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज,यवतमाळ संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री.रामसाहेब देवसरकर, सचिव माननीय श्री. डॉ. यादवराव राऊत साहेब तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव बा.कदम यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले जात आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. प्रशांत आनासाने,महिला सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा. अर्चना मिटके, श्री बंटी रुढे, पी. एस. भारती लाईफलाईन बहुउद्देशीय संस्था सचिव नेहरू युवा केंद्र यवतमाळ तालुका स्वयंसेवक यांचे हातभार लागले, उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी जयश्री व वैष्णवी ताततोडे यांनी केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रशांत आनासाने यांनी केले आयोजित शिबिरातील सर्व कार्यक्रमाचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रास्ताविकातून कार्यक्रम अधिकारी यांनी केले.
स्वागत गीत कु. धनश्री दळवी व भाग्यश्री दळवी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. अर्चना मिटके यांनी केले.
