✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.27फेब्रुवारी):-रोजी शंकरराव सरनाईक वाचणालय येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता प्रशिक्षण सोहळा घेण्यात आला होता,या प्रसंगी उल्लेखनिय पक्षाच्या इतीहास कार्याची माहीती बांधणी कशा पध्दती करणे हि मोहीम राबविण्यात आली,यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुका येथे समिक्षा,संघटन,संवाद प्रशिक्षण शीबीराचे एकदिवशीय आयोजन करण्यात आले होते.
याच शिबीरामध्ये तरूण,तडफदार,तत्पर्रत अग्रेसर असणारा युवा नेतृत्व तळमळीने समाज कार्य करनारा गोरगरीबांच्या सुखादुःखात साथ देणारा युवा नेता स्वप्नील गंगाधर पाईकराव यांची वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा युवा आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली,या निवडीचे नियुक्तपत्र पच्छीमचे जिल्हाध्यक्ष धनंजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले आहे.
सदरी युवा जिल्हाआघाडी जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली पंरतु पक्षाशी एकनिष्ठा राहुन पक्ष,बांधणी शाखा बांधनी व कार्यकर्ता मेळा वा अश्या अनेक बाबी उराशी बाळगुण तनमन,धनाने आदरणीय अँड,बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही धुरा आपल्या खांद्यावरती देत आहो तेव्हा कुठल्याही प्रकारे पक्षाला गालबोट लागु नये हि प्रथमता दक्षता बाळगवावी आणी पक्षाच्या पदाधिकाऱ्याना विश्वासात घेऊनच पुढील कार्याला पुढाकार घ्यावा असे पक्षाच कामकाज आहे जोमाने कामाला लागा पुढील कारकीर्तीस खुपखुप शुभेच्छा




