Home महाराष्ट्र उद्योगाचे प्रदूषण खपवून घेतल्या जाणार नाही : डी. के. आरीकर

उद्योगाचे प्रदूषण खपवून घेतल्या जाणार नाही : डी. के. आरीकर

103

✒️समुद्रपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

 समुद्रपूर(दि.27फेब्रुवारी):-आपल्या देशात व राज्यात प्रदूषणाने थैमान घातले असून नागरिकांनी ‘जगावं कि मरावं” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.उद्योगानी प्रदूषणाच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. म्हणून पर्यावरणाचा समतोल राखून विकास साधला पाहिजे. त्याचप्रमाणे स्थानिकांना रोजगार सुद्धा उपलब्ध करून दिला पाहिजे, अन्यथा उद्योगाचं प्रदूषण खपवून घेतल्या जाणार नाही. असे विचार समुद्रपूर येथील विदर्भ स्तरीय पर्यावरण संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून बोलतांना पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे अध्यक्ष दलित मित्र व आदिवासी सेवक डी. के. आरीकर यांनी व्यक्त केले. समुद्रपूर जि. वर्धा येथिल पंचायत समितीच्या सभागृहात विदर्भ स्तरीय पर्यावरण संमेलन आयोजित करण्यात आले होते.

त्याप्रसंगी डी. के. आरीकर बोलत होते. यावेळी उदघाटक म्हणून हिंगणघाटचे आमदार समिर कुणावर, माजी आमदार राजूभाऊ तिमांडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीरबाबू कोठारी, समुद्रपूरच्या नागराध्यक्षा योगिताताई तुळणकर, प्रसिद्ध साहित्यिक डॉ. बळवंत भोयर, हरीश ससणकर, विजयाताई धोटे, वर्षाताई कोठेकर, स्वाती दुर्गमवार, माजी नागराध्यक्ष शिलाताई सोनारे, महेंद्र शिरोडे, समीक्षा मांडवकर, गुणेश्वर आरीकर, राणी राव, नमिता पाठक, राजेश्वर राजूरकर, देवा तांबे, विनोद सातपुते, लतिका डगर, प्रीती वासनिक, विनोद दोंदल, अमोल घोटेकर, बाबा भोयर, यांची उपस्थिती होती. सर्व प्रथम विद्या विकास महाविद्यालय जवळून वृक्ष दिंडी घेऊन रॅली काढण्यात आली व समुद्रपूर शहरात ठिकठिकाणी रॅलीचे स्वागत करण्यात आले.

समुद्रपूर शहरात पहिल्यांदा एक आगळे वेगळे पर्यावरण संमेलनाचे आयोजन केल्याबद्दल कौतुक करण्यात येत होते. कार्यक्रमाची सुरवात रयतेचे राजे विश्वभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. याप्रसंगी पर्यावरण व सामाजिक तसेच निबंध व पोस्टर स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पर्यावरण रत्न, पर्यावरण मित्र व समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात बहुजन ललकार च्या पर्यावरण विशेषांकाचे मान्यवारांच्या प्रकाशन करण्यात आले. पर्यावरण संमेलनात विकास विद्यालयाच्या वतीने पर्यावरण जागुतीसाठी पथनाट्य सादर करण्यात आल्याबद्दल सर्वत्र स्तुती करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे संचालन कु. नम्रता सावंत यांनी प्रास्ताविक समीक्षा मांडवकर यांनी तर आभार महेंद्र शिरोडे यांनी केले व कार्यक्रमांची सांगता झाली कार्यक्रमासाठी नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, भंडारा व गडचिरोली येथून पर्यावरण प्रेमी आवर्जून उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here