✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)
चंद्रपूर(दि.24फेब्रुवारी):-गेल्यावर्षी आलेल्या जय भीम चित्रपटाने आदिवासी समाजावर होत असलेल्या अन्यायाचे जीवित चित्रीकरण सादर केले होते.
चंद्रपूर जिल्ह्यात जयभीम चित्रपटाचे पुनरावृत्ती होत असल्याचे चिन्ह दिसत आहे.जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील कुसुम्बी गावातील आदिवासी समाज बांधवांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत मानिकगड सिमेंट कंपनीतर्फे अवैध कब्जा करीत मागील 42 वर्षांपासून चुनखडीचे अवैध उत्खनन केल्या जात आहे.
कंपनीची मुजोरी इतकी जास्त आहे की, आदिवासी बांधवांना मोबदला देणे तर सोडाच त्यांना स्वतःच्या जमिनीवर पाय सुद्धा ठेवू दिल्या जात नाही ही विदारक परिस्थिती आहे.
आदिवासी बांधवांच्या या संघर्षाला तलाठी विनोद खोब्रागडे यांची साथ मिळाली. त्यांनी सदर प्रकरणाला हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, तसेच अनुसूचित जनजाती आयोगाने समोर नेले.
सदर प्रकरणात जनजाती आयोगाने जिल्हाधिकारी विनय गौडा यांना हजर राहण्याचे सूचना दिल्या मात्र जिल्हाधिकारी हे सुनावणी करीता गैरहजर झाले तसेच त्यांनी स्वतः उपस्थित न राहता उप जिल्हाधिकारी तृप्ती सुर्यवंशी या हजर झाल्या. यामुळे
राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने पोलीस महासंचालक रजनिश सेठ यांना पत्र देत 02 मार्च पर्यंत जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करीत आयोगा समोर उभे करण्याचा आदेश दिले.यामुळे प्रशासन विभागात एकच खळबळ माजली आहे.
आदिवासी बांधवांच्या या लढ्यात अजून किती वर्षे लागतील हे सध्या तरी माहीत नाही त्यांना त्यांच्या हक्काच्या जागेचा मोबदला मिळतो किंवा नाही हे सांगता येत नाही,मात्र कायद्यासमोर सारेच एकाच माळेतील मनी असल्याचे परत एकदा सिद्ध झाले.मानिकगड सिमेंट कंपनीने सदर जागेची नियमबाह्य लीज वाढवलेले आहे.




