✒️सुयोग सुरेश डांगे(चिमूर प्रतिनिधी)
चिमूर(दि.23फेब्रुवारी):-दिव्यवंदना आधार फाउंडेशन द्वारा संचालित दिव्यवंदना आधार निवारा गृहाचे भूमिपूजन दिनाक २६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता जामगाव (को.) येथे खासदार अशोक नेते यांचे हस्ते होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार बंटी भांगडिया राहणार आहेत. नियोजित आधार निवारा गृहात रोडवरील बेघर, बेवारस, वृद्ध व्यक्ती, निराधार यांना निवास व भोजनासह स्वावलंबी जीवनाचे धडे देणार असल्याची माहिती दिव्यवंदना आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शुभम पसारकर यांनी दिली.
या भूमिपूजन सोहळाकरिता भिसीचे ठाणेदार राऊत, टायगर ग्रुपचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सूर्या अटबाले, मनसे अध्यक्ष राहुल बालमवार, नागपुर टायगर ग्रुपचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत नखाते, गडचिरोली जिल्हा अध्यक्ष दिपक भारसागडे, युवा मोर्चा गडचिरोली जिल्हा महामंत्री संजय बारापात्रे, चिमूर शहर अध्यक्ष बंटी वनकर, टायगर ग्रुप अहेरीचे अध्यक्ष साईअन्ना तुलसीगिरी, चिमूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मधुकर गोडे, “चिमूर का छोकरा” चे यु-ट्यूबर आशिष बोबडे, साथ फाउंडेशन बुट्टीबोरीचे अध्यक्ष प्रयाग डोंगरे, आँल रिलीजन युथ फाउंडेशन भद्रावतीचे अध्यक्ष नितेश बानोत, बंधुत्व फाउंडेशन नागपूरचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त कर्नल राजू पाटील आदी मान्यवरांना निमत्रीत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.




