✒️खापरखेडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
खापरखेडा(दि.9फेब्रुवारी):- भारत स्काऊट्स आणि गाईड्सच्या अधीनस्थ महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स आणि गाईड्स व नागपुर भारत स्काऊट्स आणि गाईड्स जिल्हा कार्यालयाच्या वतीने सन 2022 मध्ये राज्य प्रशिक्षण केंद्र नागार्जुन रामटेक येथे आयेजित स्काऊट्स आणि गाईड्सच्या राज्य पुरस्कार परीक्षेचा नुकताच निकाल घोषित झाला असून यात खापरखेडा येथील एक स्काउट व दोन गाईड्स यशस्वीपने उत्तीर्ण झाले आहेत.
या राज्य पुरस्कार परिक्षेमध्ये प्लाज्मा स्कूलचे गाईड्स कनक प्रवीण चावके व जिया नेमचंद सेवतकर तर सीक्रेट हार्ट स्कूलचा विद्यार्थी आदित्य संजय शाह या स्काऊटचा समावेश आहे . हे तिघेही स्काऊट्स मास्टर शेखऱ कोलते यांच्या मार्गदर्शनात खापरखेडा स्काऊट्स आणि गाईड्स ओपन ग्रुपमध्ये प्रशिक्षण घेत आहेत . यापूर्वी शंकरराव चव्हाण इंग्लिश प्रायमरी स्कूलचे स्काऊट गौरव नितेश कांबळे , गाईड्स सानिया रवि प्रधान व सुष्मिता रवि प्रधान , तशेच पारशिवनी येथील नीरज संजय नागोसे, चैतन्य रणजीत ढोपरे, सानिया इनायत अली सय्यद व आयेशा इनायत अली सय्यद हे स्काऊट्स गाईड्स सुद्धा राज्य पुरस्कार परिक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत .
हे सर्व स्काऊट्स आणि गाईड्स पुढील वर्षी आयोजित राष्ट्रपति पुरस्कार परीक्षेमध्ये सुद्धा सहभागी होणार आहेत.
या राज्य पुरस्कार परिक्षामध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल प्लाज्मा स्कूलच्या मुख्याध्यापिका लैला मैथ्यू , शंकरराव चव्हाण इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका राधा मोहरील , ओपन ग्रूपचे स्काउट्स मास्टर शेखर कोलते , गाईड कॅप्टन अनिता ठाकरे, अनिता सोंगेरवा, मंजिरी श्रीवास्तव व सर्व शिक्षकगण यांनी तिन्ही स्काऊट्स व गाईड्सला शुभेछ्या दिल्या.




