Home महाराष्ट्र विशेष श्रम संस्कारातील संस्कार आयुष्यभर जपा: ॲड. आनंदराव पाटील

विशेष श्रम संस्कारातील संस्कार आयुष्यभर जपा: ॲड. आनंदराव पाटील

67

✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कराड(दि.8फेब्रुवारी):-ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालय उंडाळे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ॲड.आनंदराव पाटील हे बोलत होते.

राष्ट्रीय सेवा योजनेवर विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासासाठी खूप मोठ्या प्रमाणावर संधी प्राप्त होते आठवड्याभराच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरामधून जो दैनंदिन क्रम आखलेला असतो ते तो दिनक्रम आयुष्यभर जपला त्या सात दिवसांमध्ये घेतलेले संस्कार आयुष्यभर आपल्या मध्ये बनवले तर व्यक्तिमत्व विकासास फायदेशीर ठरते या शिबिरामध्ये समूहाने कशाप्रकारे काम करायचे एकमेकाला कसे समजायचे समजून घ्यायचे एकमेकाला कशी मदत करायची या गोष्टीचे भान विद्यार्थ्यांना येते आणि आयुष्यभर हेच आपल्याला करायचे असते विद्यार्थ्यांनी या गोष्टी आपल्या दैनंदिन व्यवहारात सतत पाळाव्यात असे प्रतिपादन त्यांनी केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष घोगाव गावच्या सरपंच सौ सीमा पाटील होत्या. त्यांनी या महाविद्यालयाने घोगाव गावची निवड केली. याबद्दल धन्यवाद मानले. तसेच यावर्षी शेती विषयी कार्यक्रम, पशूंचे लसीकरण, रक्त तपासणी व नेत्र तपासणी शिबिर, ग्राम स्वच्छता गावातील पाण्याच्या टाकीचा गाळ काढणे, देवालयाची स्वच्छता , स्मशानभूमीची स्वच्छता असे विविध उपक्रम विद्यार्थ्यांनी राबवले. गावामध्ये एक नवीन चैतन्य निर्माण केले. प्रबोधनात्मक कार्यक्रमातून नवनवीन माहिती मिळवून दिली या सर्व गोष्टीबद्दल शिबिरार्थींचे व महाविद्यालयाचे धन्यवाद मानले.

या कार्यक्रमाची सुरुवात ॲड. आनंदराव पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. बाळसिद्ध विद्यालय घोगावच्या विद्यार्थ्यांनी झांजपथकाने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. शिबिरार्थी स्वयंसेवक संदीप शिंदे यांनी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक दाखवून सर्व ग्रामस्थांची मने जिंकली. त्यानंतर मुख्य समारोपाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. याप्रसंगी श्री सुनील पाटील,श्री. निवास शेवाळे (उपसरपंच) , श्री. शंकर पाटील, श्री. रमेश शेवाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिबिरार्थी मधून कुमारी तनुजा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रकल्प अधिकारी प्रदीप चोपडे यांनी शिबिराचे अहवाल वाचन केले. प्र. प्राचार्य डॉ.जाविद शेख यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.स्वप्नाली पाटील यांनी केले तर आभार सहाय्यक प्रकल्पाधिकारी प्रा.हणमंत पिसाळ यांनी मांडले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक , ग्रामस्थ, शिबिरातील स्वयंसेवक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here