Home Education कॅन्सरचे प्रकार आणि लक्षणांची माहिती प्रत्येक नागरिकांनी जाणुन घ्यावी

कॅन्सरचे प्रकार आणि लक्षणांची माहिती प्रत्येक नागरिकांनी जाणुन घ्यावी

83

🔸कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे अनेक आहेत प्रकार 

🔹जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल रूडे यांनी दिली जनहितार्थ माहिती

✒️प्रतिनिधी नागपूर(चक्रधर मेश्राम)

नागपूर(दि.5फेब्रुवारी):-कर्करोग हा आजार फार गंभीर असून या आजाराबाबत सर्वांना माहीती असणे आवश्यक आहे. या आजाराबाबतची लक्षणे काय आहेत याबद्दल आवश्यक तेवढी माहिती प्रत्येक नागरिकांना नसते. म्हणूनच या जीवघेण्या आजाराचे सर्व प्रकार आणि माहिती सर्वांना माहीत असणे आवश्यक आहे.कॅन्सर अर्थात कर्करोग आजही जगासमोर एक आव्हानात्मक जीवघेणी समस्या आहे. दरवर्षी कर्करोगामुळे हजारो लोक मृत्यू पावतात. कर्करोगाचा जगाशी सामना झाला तेव्हा एक समज निर्माण झाला की जे धुम्रपान करतात त्यांनाच कर्करोग होतो किंवा तंबाखू खाल्ल्यानेच कर्करोग होतो. परंतु हळूहळू पोटाचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग आणि अन्य कर्करोग जगासमोर उलगडू लागले आणि हे सत्य समोर आले की, कर्करोग कोणालाही आणि कसाही होऊ शकतो आणि तेव्हापासून कर्करोगाची जास्त भीती निर्माण झाली. कर्करोग शरीरात असूनही कळत नाही. पण जस जशी वर्षे लोटली तसे…. तसे विज्ञान प्रगत झाले आणि आता कर्करोगापासून वाचवणारे उपचारही आलेत. पण तरी आजही जनमानसात कर्करोगाबद्दल पाहिजे तितकी जागरुकता नाही.

कर्करोग हा आता एक सामान्य आजार झाला आहे. त्यामुळे त्याबद्दल प्रत्येकाला माहिती असणे गरजेचे आहे की नक्की कर्करोग आहे तरी काय? आपलं शरीर हे अनेक पेशींनी बनलेले आहे आणि शरीराचा विकास हा पेशी दुभंगल्यानेच होतो. 18 वर्षांचे होतो तोपर्यंत शरिरातील पेशी अरबो वेळा दुभंगल्या जातात. पेशींचं हे विभाजन एका रचनेनुसार होतं असते आणि ते नियंत्रणात असते . कर्करोगाचा आजारही याच पेशींच्या विभाजनामुळे होतो. पेशींचे विभाजन हे आपल्या शरीराच्या विकासासाठी अतिशय गरजेचे आहे, पण हे विभाजन नियंत्रणात रहायला हवे. जर हे विभाजन नियंत्रणाबाहेर गेले की माणूस कर्करोगाचा बळी पडतो. कर्करोगाचे प्रकार आणि त्याची लक्षणे यांबद्दल प्रत्येक नागरिकांनी जाणून घेणे आवश्यक आहे.

सर्वाईकल कॅन्सर हा कॅन्सरच्या प्रकारातील सगळ्यात वेगाने पसरत जाणारा कॅन्सर आहे. सर्वाइकल कॅन्सर हा स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. ज्या स्त्रिया आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात त्यांच्या भोवती हा कर्करोग लवकर विळखा घालण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कॅन्सरमध्ये स्त्रियांच्या गर्भाशयातील कोशिकांमध्ये अनियमित वृद्धी होऊ लागते आणि कॅन्सर उदयास येतो. या कॅन्सरची काही लक्षणे म्हणजे सेक्स करताना योनीमध्ये वेदना होणे, योनीतून लाल रक्त बाहेर पडणे , अचानक डिस्चार्ज होणे, खूप थकवा जाणवणे, पाय दुखणे, चिडचिड होणे, कामात मन न लागणे ही लक्षणे आहेत.

स्तनांचा कर्करोग सुद्धा स्त्रियांमध्येच पाहायला मिळतो पण याचा अर्थ हा नाही की, कर्करोग पुरुषांना होत नाही. या कॅन्सर दरम्यान सुरुवातीला स्तनांवर एक गाठ तयार होत असल्याची जाणीव होते. हि गाठ हळूहळू पसरते आणि त्यातून कॅन्सरचा विळखा जीवन उध्वस्त करतो.यासाठी वेळोवेळी आपल्या स्तनांची तपासणी करणे आवश्यक आहे. स्तनांच्या त्वचेचा रंग बदलणे, स्तन कमजोर दिसणे आणि लटकू लागणे, एक किंवा दोन्ही स्तनांचा आकार बदलणे हि काही स्तनांच्या कर्करोगाची सामान्य लक्षणे असुन शकतात. अशी लक्षणे दिसल्यास तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करावे.

ब्लड कॅन्सर सर्वात वेगाने पसरणारा आणि फारच घातक असणारा कर्करोगाचा प्रकार असुन रक्ताच्या कर्करोगात मनुष्याच्या शरीरातील रक्तांच्या पेशीत कॅन्सर वाढू लागतो. यामुळे शरीरात रक्ताची कमी निर्माण होते, आणि हा कर्करोग वेगाने संपुर्ण शरीरात झपाट्याने पसरतो .थकवा जाणवणे, अचानक शरीरावर जखम होणे, सतत डोके दुखणे, श्वास घेण्यात समस्या निर्माण होणे यांसारख्या अनेक समस्या एकामागोमाग ….एक दिसू लागल्या की ती रक्ताच्या कर्करोगाची लक्षणे समजावी. आणि शक्य तितक्या लवकर डॉक्टरांकडून उपचार सुरु करावेत.

लंग कॅन्सर ज्याला फुफ्फुसांचा कर्करोग असेही म्हटले जाते. या कर्करोगाच्या प्रकारात मनुष्याच्या फुफ्फुसांची स्थिती अतिशय खराब होते. श्वास घेण्यात अडचण निर्माण होते, हाडे आणि सांधे दुखु लागतात. खूप अशक्तपणा आणि थकवा जाणवतो. हि या कर्करोगाची काही प्राथमिक लक्षणे आहेत. प्रदूषण आणि धुम्रपान यांमुळे हा कर्करोग मोठ्या प्रमाणावर पसरतो. कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत जे शरीरासाठी आणि जीवासाठी फारच घातक आहेत .त्यामुळे आपल्या आरोग्याकडे आणि आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.अशी माहिती गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे यांनी दिली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here