Home महाराष्ट्र विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबनाचे धडे शिकविणारी रासेयो शिबीर- श्री. अशोकजी भैया

विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबनाचे धडे शिकविणारी रासेयो शिबीर- श्री. अशोकजी भैया

0

🔹मौजा रणमोचन येथिल सात दिवसीय निवासी शिबीरातील समोरोपीय कार्यक्रमातील अध्यक्षीय मार्गदर्शनातील प्रतिपादन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि. 31 जानेवारी):-राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी हा शिबीरातून जिवन कसे जगावे याविषयी शिस्त, समयसूचकता, सामाजिक जाणीव, सामाजिक बांधिलकी,आपुलकी, सहानुभूती ,दया व राष्ट्राप्रती देशभक्ती या गुणांचे शिकवण शिबीरातून शिकतो त्यामुळे रासेयोच्या स्वयंसेवक हा एक प्रकारे सामाजिक जबाबदारी स्वीकारतो आणि सोबतच समाजाचा जबाबदार घटक म्हणून आपली भूमिका पार पाडतो यातून राष्ट्रीय एकात्मतेला बळ मिळते त्यामुळे रासेयो स्वयंसेवकाकडून उत्तम कार्य घडतात तेव्हा खरं म्हणजे त्यांच्यात स्वतः स्वावलंबन जिवन जगण्याची उमेद निर्माण होते.हे स्वावलंबन जिवन जगण्याची ऊर्जा हे रासेयो शिबीर आहे.

असे मौलिक विचार श्री अशोकजी भैया यांनी सात दिवसीय निवासी शिबीराच्या समोरोपीय कार्यक्रमातील अध्यक्षीय मार्गदर्शनातून रणमोचन येथे प्रतिपादन केले. यावेळी विचारपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ एन एस कोकोडे माजी प्राचार्य ने हि महाविद्यालय ब्रम्हपुरी, सौ निलिमा निळकंठराव राऊत सरपंच रणमोचन, प्राचार्य डॉ डी एच गहाणे, उपसरपंच सदाशिव ठाकरे, डॉ हर्षा कानफाडे, श्री योगेश पिलारे, संजय झूरमुरे, मुख्याध्यापक, मेजर विनोद नरड, डॉ सुभाष शेकोकर , मंदाताई सहारे, डॉ आर के डांगे व शिबीर प्रमुख डॉ प्रकाश वट्टी, प्रा अभिमन्यू पवार, डॉ विवेक नागभिडकर व आशिष साखरकर इ. मान्य. उपस्थित होते. याप्रसंगी डॉ कोकोडे यांनी रासेयोचा स्वयंसेवक हा कोणत्याही संकटांना तोंड देतो यश व अपयश ह्याना तो घाबरत नाही.

अपयश हेच यशाचा पुर्वाध आहे. शिबीर हे विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तीमत्वाचे धडे गिरविते त्यातूनच खरा विद्यार्थी घडतो त्यांच्याकडून देशसेवा घडत असते. असे मोलाचे मार्गदर्शन केले. तर बाकीच्या मान्यवरानी थोडक्यात मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ डी एच गहाणे यांनी विद्यार्थ्यांना जिवन यशस्वी करण्याचा उत्तम उदाहरण म्हणजे रासेयो हे शिबीर आहे. असे डॉ डी एच गहाणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.याकार्यक्रमाचे सात दिवसीय शिबीराचे अहवाल वाचन डॉ आशिष साखरकर यांनी केले,तर प्रास्ताविक प्रा अभिमन्यू पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ विवेक नागभिडकर यांनी केले तर आभार शिबीर प्रमुख डॉ प्रकाश वट्टी यानी मानले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ अस्मिता कोठेवार, कु पायल तुमाने,सौ शितल पांचाळ ,सौ प्रिती टिकरे, गोपाल करंबे, सुरज के. मेश्राम, महेश राऊत, अश्विनी राऊत, भैरवी राऊत, विक्रम मानकर, रुचिता येलमुले, राणी गेटकर, गणेश धंजूळे, प्रफुल्ल खेत्रे‌ , रोहीत सहारे , मयुरी ठेंगरी ,सौरभ तलमले, प्राजक्ता विखार, पायल भर्रे, नंदिनी प्रधान यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here