




✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
कराड(दि.28जानेवारी):-ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय , उंडाळे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिर घोगाव येथे सुरू आहे. या शिबिरामध्ये राष्ट्र निर्मितीमध्ये युवकांचे योगदान या विषयावर प्रा. महेश चव्हाण हे बोलत होते. ते म्हणाले राष्ट्राची निर्मिती ही युवकांच्या हातामध्ये आहे. सध्या भारत हा देश जगामध्ये सर्वात तरुण देश म्हणून ओळखला जातो. या देशातील तरुणांनी आत्मबळ ओळखून सकारात्मक दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्टीचा प्रयत्न केला तर त्यांना विविध क्षेत्रांमध्ये चांगले यश मिळते. स्वतःची प्रगती साधून उद्योग व्यवसाय विविध संशोधनाकडे लक्ष दिले. तर त्यामधूनच राष्ट्र निर्मिती होते. प्रत्येकाला आपल्या देशाचा अभिमान असतोच.
हा देशा अभिमान आपल्या कार्यातून आपल्या कामातून व्यक्त होणे यामधूनच राष्ट्राची उभारणी होत असते. कोणीही एक व्यक्ती राष्ट्र निर्माण करू शकत नाही यासाठी संकटित बाळाची आवश्यकता असते. संघटना दृष्टिकोन विचार केला स्वतःला ओळखलं त्यामधून प्रगती गर्दी केली तर राष्ट्राची प्रगती आपोआप होत असते असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.सुरेखा साळुंखे तर सौ. सुनंदा भावके, श्री. रमेश शेवाळे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन प्रकल्प अधिकारी प्रा. प्रदीप चोपडे व सहाय्यक प्रकल्पाधिकारी, प्रा. हणमंत पिसाळ ,शिबिरार्थी स्वयंसेवक, प्रशासकीय कर्मचारी यांनी केले होते.




