




✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि. 28 जानेवारी):- पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत श्री महर्षी मार्कंडेय महामुनी यांची जयंती दि.24 जानेवारी रोजी शिव मंदिर गुजरवाडी ब्रह्मपुरी येथे पद्मषाली समाज ब्रम्हपुरी तर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
समाजाबांधव व भगिनी तर्फे श्री.महर्षी मार्कंडेय महामुनी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. महिला मंडळी यांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून आयोजित केला होता. याप्रसंगी समाजाचे महिला पुरुष मंडळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजना साठी कैलास बईरवार, मुरली अडेटवार, विनोद पेदुलवार, अजय बिट्टूरवार, संतोष सिलवेरी, रवि चामलवार, सुधाकर बंडेवार, सुधाकर पेदुलवार, विशाल एजमुलवार, सागर बल्लेवार, रवि रापेल्लीवार, मुकेश बोधनवार,दिगदेऊतुलवार तसेच महिला मंडळीनी अथक परिश्रम घेतले.




