✒️कोरची प्रतिनिधी(वसीम शेख)
कोरची(दि.26जानेवारी):-26 जानेवारी ला 74 वा प्रजासत्ताक दिवस निमीत्त तसेच विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव सर यांच्या वाढदिवसा निमीत्त पोलीस स्टेशन कोरची या ठीकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
वृक्षारोपण प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरिक्षक गणेश फुलकवर, पोलीस निरिक्षक कवडो, आशिष अग्रवाल तालुका अध्यक्ष अन्याय अत्याचार विरोधी कोरची कोरची, सुरज हेमके शिक्षक पार्वताबाई विद्यालय कोरची, रुखमन घाटघुमर, निसर्गप्रेमी नंदकुमार रंदाळे व सुमीत राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.
निसर्गप्रेमी नंदकुमार रंदाळे व सुमीत राठोड हे शुभेच्छारुपी एक वृक्षारोपण उपक्रम राबवत असुन सुमित राठोड यांना पर्यावरण क्षेत्रातील कार्य करिता बरीच राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. वृक्षारोपण करताना जिल्हा पोलीस व एसआरपीएफ चे अंमदलदार आदी उपस्थित होते.




