✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि. 25 जानेवारी):-स्थानिक ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रह्मपुरी येथे मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाला नेवजाबाई हितकारणी महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. धनराज खानोलकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते .मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी बोलीभाषेचा फार मोठा वाटा आहे, याविषयीचे मत व्यक्त करताना त्यांनी महाराष्ट्रात बोलल्या जाणाऱ्या अनेक बोलींमुळेच मराठी भाषा समृद्ध झालेली आहे ,असे मत व्यक्त केले.
,त्याबरोबरच मायबोली जपली पाहिजे असाही विचार व्यक्त केला, याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठी विभाग प्रमुख डॉ.जगदीश मेश्राम हे होते, तर प्रमुख उपस्थिती डॉ. एल एस नंदेश्वर यांची लाभली, कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. तुफान अवताडे यांनी केले.




