🔸आदर्शमाता प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकाद्वारे माहिती
✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
कराड(दि.23जानेवारी):- तालुक्यातील आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कर्तुत्वान महिलांचा सन्मान करणार,असून संबंधित सन्मानासाठी समाजकार्यात सक्रिय असणाऱ्या माता-भगिनींनी आपल्या कार्याची माहिती प्रतिष्ठानकडे पाठवावी असे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
प्रतिष्ठान च्या वतीने दिलेल्या पत्रकातील माहिती अशी,पाडळी (केसे),तालुका कराड येथील आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान हे विविध सामाजिक हे क्षेत्रात कार्यरत असून दलित, पददलित,वंचित आणि निराधार लोकांना सदैव मदतीचा हात देत असते. कर्तुत्वान आणि समाजकार्यात सक्रिय असणाऱ्या लोकांच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकून त्यांचे कौतुक करणे हा देखील सामाजिक कार्याचा एक भाग आहे. या उद्देशाने प्रति वर्षाप्रमाणे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा यानिमित्ताने विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात येणार आहे.
प्रतिष्ठानच्या वतीने विशेष होणाऱ्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या माता आणि भगिनींनी आपल्या सामाजिक कार्याची थोडक्यात माहिती संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान पाडळी (केसे), पोस्ट सुपने,तालुका कराड, जिल्हा सातारा या पत्त्यावर पाठवावी असे आवाहनही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.




