Home महाराष्ट्र “लोकल टु ग्लोबल ” हि संकल्पना रासेयो शिबिरातुन राबविणार : डॉ. केदारसिंग...

“लोकल टु ग्लोबल ” हि संकल्पना रासेयो शिबिरातुन राबविणार : डॉ. केदारसिंग रोटेले

141

🔹काग येथे रासेयो शिबिराचे उद्घाटन

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमुर प्रतिनिधी)

चिमूर(दि.21जानेवारी):-“चला नदीला जावु या” या राष्ट्रीय सेवा योजना शिविर काग येथील उद्घाटन प्रसंगी डॉ. केदारसिंग रोटेले “लोकल टु ग्लोबल” हि संकल्पना रासेयो शिबिरातून राबविणार असल्याचे प्रतिपादन दिले.

यावेळी नदी खोलीकरण, नदीची नांगरणी कशी करावी, व्यसनाचा त्रास इतर वाईट प्रथा परंपरातून लोकांना जागृत करणे, अंधकारातून प्रकाशाकडे कसे नेता येईल यावर विस्तृत माहिती त्यांनी सांगितली. आठवले समाजकार्य महाविद्यालयातून बि.एस.डब्लु., एम. एस. डब्लू., एम. फिल. पि. एचडी., वि. ए., बि. कॉम. असा अभ्यासक्रम सुरु आहे. माझे वडील स्व. डॉ. चंदनसिंग रोटेले यांच्या गुणामुळे व आशिर्वादामुळे मला समाजकार्य करण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. आपल्या सगळ्यांचा आशिर्वाद माझेसोबत आहे, मी समाजाची सेवा करणार आहे.

याप्रसंगी डॉ. केदारसिंग रोटेले संस्था अध्यक्ष, किरणताई रोटेले रजिस्टार तथा माजी सिनेट सदस्या, अविनाश धोंगडे, गिरडे, उमा नदी प्रहरी अजय काकडे, नानाजी मेश्राम, कार्यक्रमाधिकारी डॉ. विणा काकडे, गुरुदेव सेवा मंडळाचे सदस्य, बौध्द पंचकमेटी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी प्राचार्य डॉ. शुभांगी वडस्कर म्हणाल्या की, स्व. डॉ. चंदनसिंग रोटेले हे तिन समाजकार्य महाविद्यालयाचे आधारस्तंभ होते. त्यांना प्रथम अभिवादन करून चला नदीला जावु या या उपक्रम या संकल्पनेतील रासेयो शिविर यशस्वी होईल. महाविद्यालयाने तिन नॅक प्रक्रिया पुर्ण केल्या असून पदवी ते पि. एच. डी. अभ्यासक्रम सुरु असुन अविरत सेवा महाविद्यालय देत आहे. तरुण नागरिकांना नवचेतना देण्याचे कार्य तसेच युवकाचे प्रभावी व्यक्तीमत्व घडविणे, सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून सेवाभाव निर्माण करण्याचे कार्य शिबिराचे माध्यमातुन होत आहे. आपण समाजाचे व राष्ट्राचे देणं लागते या कर्तव्य भावनेतुन आरोग्य, श्रमदान, राष्ट्रीय एकात्मता, जलव्यवस्थापन या बाबींचा बाळकडु ग्रामस्थांना देता येईल. जसे जसे सहकार्य वाढेल तसे तसे विकास वाढेल.

गावास उन्नत करण्यासाठी आम्ही सर्व प्रक्रिया पुर्ण करु. ग्रामस्थ घोंगडे म्हणाले की, या शिबिरास आम्ही सर्व सहकार्य करु. डॉ. चंद्रभान खंगार म्हणाले की, शुध्द बिजापोटी फळे रसाळ गोमटी या गावात सर्व धर्म समभाव असुन गावातील महिला जागृत आहेत. त्यामुळे सदर शिबिर पुर्णतः यशस्वी होईल. उमा नदी प्रहरी अजय काकडे म्हणाले की, या अभियाना अंतर्गत नदीचे पुर्नजीवन, नदी स्वच्छ करणे, नदीची नांगरणी, सांडपाणी नियोजन, पाणी टंचाई प्रश्न, गावातील शोषखड्डे असे उपक्रम राबवुन पाण्याची पातळी वाढवणार आहोत.

कार्यक्रमाचे संचालन कार्यक्रमाधिकारी डॉ. विणा काकडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार आचल दांडेकर हिने मानले. मोठया उत्साहात शिबिराचे उद्घाटन पार पडले. उद्घाटनाच्या पुर्वी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गित गायले. तसेच समारोपीय कार्यक्रमानंतर शिबिरार्थ्यानी आदिवासी नृत्य करुन ग्रामस्थांने मने जिंकली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here