✒️वर्धा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
वर्धा(दि.20जानेवारी):-संशोधन करणे ही आधुनिक काळाची गरज असून प्रत्येकांनी नावीन्यपूर्ण संशोधन केले पाहिजे. उच्च शिक्षण आणि संशोधनात संशोधकांनी उंच भरारी घेतली पाहिजे. संशोधकांनी जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर नवसृजनात्मक संशोधन करून जागतिक स्तरावर भारताचे नावलौकिक केले पाहिजे.राष्ट्राचा खरा विकास करायचा असेल तर नवीनतम संशोधन पुढे आले पाहिजे. संशोधकांनी वेगवेगळ्या विषयावर जे प्रश्न मनामध्ये निर्माण झाले आहेत त्यावर संशोधन करणे आवश्यक आहे सोबतच , याकारिता प्रत्येकाला संधी दिली पाहिजे, नाविन्यपूर्ण संशोधनात भारताचे उज्ज्वल भवितव्य आहे असे प्रतिपादन नरेश पाटील यांनी केले.
कुंभलकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, वर्धा येथे आय.क्यू.एस.सी. च्या वतीने एक दिवशीय संकाय विकास कार्यक्राचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्राचे समन्वयक डॉ. सुनिल तोतडे होते.
प्रा नरेश पाटील पुढे बोलतांना असे म्हणाले की, कुठलेही संशोधनपर लेखन करताना, पेपर लिहिताना काही नियम पाळणे आवश्यक असल्याचे सांगितले. संशोधन पेपर लिहिताना सारांश, प्रस्तावना, संशोधन साहित्याचा आढावा, महत्वाचे आकडेवारी दर्शविणारे तक्ते, सारण्या, विषयाशी निगडित विविध रिपोर्ट, संशोधन विश्लेषण, सूचना शिफारशी, निष्कर्ष, संदर्भ देण्याच्या पद्धती याविषयी मार्गदर्शन केले.
महाविदयालयाचे प्राचार्य डॉ चंदू पोपटकर यांनी संशोधन करतांना संशोधकाने संशोधनाचे मूल्या जोपासावे तसेच दर्जादार लेखन करून सामाजिक प्रश्नावर प्रतिबधात्मक व उपाय योजनात्मक उपाय सुचवावेत असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे समन्वयक डॉ सुनील तोतडे यांनी हा संशोधन पेपर कसा लिहावा? हा विषय faculty development program साठी का निवडला, सध्याच्या काळातील या विषयाची गरज प्रतिपादित केली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सुनील तोतडे यांनी केले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक आय.क्यू.एस.सी. समन्वयक डॉ. महादेव चुंचे यांनी केले तर आभार प्रा. विलास बैले यांनी मानले. कार्यक्रमाकरीता प्राध्यापक वृंध्द व विदयार्थी उपस्थित होते




