Home महाराष्ट्र महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभेच्या वतीने चिमुरात संत शिरोमणी, श्री संताजी जगनाडे महाराज...

महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभेच्या वतीने चिमुरात संत शिरोमणी, श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सव

265

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमूर प्रतिनिधी)

चिमूर(दि.18जानेवारी):-सामाजिक बांधिलकी लक्षात घेवुन युवकांना संघटीत करणे, सामाजिक ध्येय तात्वीक दृष्टीकोन आणि विविध कार्यक्रमामध्ये एकसूत्रीपणा आणणे, सामाजिक शैक्षणिक व शारिरीक विकास साधणे, होतकरु विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभेच्या वतीने दिनांक २१ व २२ जानेवारीला संताजी विचार मंच चावडी मोहल्ला चिमुर येथे संत शिरोमणी, श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन केले आहे.

दिनांक २१ जानेवारीला सकाळी ७.३० वाजता ग्रामसफाई झाल्यानंतर श्री संताजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजनाकरीता दिवाकर नागोसे, हरिचंद्र हिंगणकर, प्रा. महादेवराव पिसे, परसराम खाटीक आदी उपस्थित राहतील. दुपारी १२ वाजता हळदीकुंकु कार्यक्रम, सायं. ७.०० वाजता सांस्कृतीक कार्यक्रम, जागृती भजन होईल.

दिनांक २२ जानेवारीला सकाळी ९ वाजता श्री संत जगनाडे महाराज यांची शोभायात्रा झाल्यानंतर दुपारी १२ वाजता ह. भ. प. जीवन महाराज आळंदीकर यांचे गोपालकाल्याचे किर्तन होईल. दुपारी ४ वाजता महोत्सवा दरम्यान झालेल्या स्पर्धेचे बक्षिस वितरणाकरीता महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा महिला आघाडीच्या विभागीय अध्यक्षा किर्ती कातोरे, जिल्हाध्यक्षा श्रुती घाटे, जिल्हाध्यक्षा भावना बावणकर यांची विशेष उपस्थिती राहणार असुन प्रमुख पाहुणे म्हणुन पोलीस स्टेशन चिमुरचे पोलीस निरीक्षक मनोज गभणे, विभागीय अध्यक्ष अजय वैरागडे, सामाजिक कार्यकर्ता धनराज मुंगले, सहाय्यक निबंधक राजु अगडे आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली सिनेट सदस्य निलेश बेलखेडे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. याप्रसंगी तेली समाजाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येईल. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन समाजबांधवानी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here