Home महाराष्ट्र ‘डाॕ.भिमराव रामजी आंबेडकर -दिनविशेष ‘ हे पुस्तक नवलेखकांना उपयुक्त – अॕड.अप्पाराव मैन्द

‘डाॕ.भिमराव रामजी आंबेडकर -दिनविशेष ‘ हे पुस्तक नवलेखकांना उपयुक्त – अॕड.अप्पाराव मैन्द

163

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.16जानेवारी):– डाॕ.बाबासाहेब आंबेडकर या आधुनिक महामानवाच्या विचाराने भारताच्या प्रस्थापित सनातनी व्यवस्थेला छेद दिला आहे,तथापि त्यांच्या साहित्याचीही विकृत मांडणी पारंपरीक लेखक- प्रकाशकांनी केली आहे.’ डाॕ.भीमराव रामजी आंबेडकर- दिनविशेष ‘ हे से.नि.प्राचार्य लिखीत पुस्तक डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारविश्वातील दैनंदिन घटनाचा संदर्भ देणारे म्हणून नवलेखकांना उपयुक्त ठरेल.’ असे उद्गार अॕड.अप्पाराव मैंद यांनी पुस्तक प्रकाशन सोहळ्याचा अध्यक्षीय समारोप करतांना काढले आणि लेखक मा.ल.धुळध्वज यांचे मनपूर्वक अभिनंदन केले.

ते पुढे म्हणाले की,भारतीय सनातनी समाजव्यवस्थेत प्रकाशन संस्था अडकली आहे.त्यामुळे नव लेखकांना प्रकाशक मिळत नाही.त्यासाठी ‘फुले प्रकाशन’ ही संस्था मी काढली तथापि वितरण व्यवस्था निर्माण करता आली नाही.त्यामुळे नवलेखकांचे साहित्य जनसामान्यापर्यंत पोहचत नाही अशी खंत व्यक्त करून ते पुढे म्हणाले की, विचारसाहित्याची विचिकित्सक चर्चा झाली, तरच विचारवंताचे विचार जनतेत शुद्ध स्वरूपात पोहचतात .डाॕ.बाबासाहेबाच्या साहित्य चिकित्सेला त्यांच्याच आनुयांयानी भावनात्मक अडथळे निर्माण केले आहेत.ते दूर होणे आवश्यक आहेत, असे सांगून त्यांनी लेखकाला पुढील लेखनास भरभरून शुभेच्छा दिल्या.

से.नि.प्राचार्य आणि चार्वाकवनातील धम्मसंगितीचे सक्रिय सदस्य मा.ल.धुळध्वज यांनी अथक प्रयत्नाने लिहिलेल्या ‘डाॕ.भीमराव रामजी आंबेडकर-दिनविशेष ‘या पुस्तकाचे प्रकाशन आज दि.१५ जानेवारी २०२३ रोजी अॕड.अप्पाराव मैंद यांचे अध्यक्षतेखाली चार्वाकवनांत आयोजित कार्यक्रमात झाले.

या प्रकाशन समारंभाला प्रमुख पाहूणे म्हणून माजी शिक्षण सभापती (जि.प.)सेनि.प्रा.टी.बी.कानिंदे,से.नि.वन अधिकारी दत्तानंद गोस्वामी,सिमा गोस्वामी हे उपस्थित होते.

तथागताच्या मूर्तीला पुष्पार्पण आणि म.फुले आणि डाॕ.बाबासाहेब यांच्या प्रतिमांस पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली.प्रास्तविकात से.नि.केंद्र प्रमुख गोवर्धन मोहिते यांनी लेखकाचा परिचय आणि त्यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली.

से.नि.प्रा.टी.बी.कानिंदे यांनी लेखक मा.ल.धुळध्वज यांनी सदरचे पुस्तक लिहिताना घेतलेल्या कष्टाची समग्र माहीती दिली आणि लेखकाचे अभिनंदन केले.दत्तानंद गोस्वामी व बी.जी.राठोड यांनी समयोचित विचार व्यक्त केले.

या प्रकाशन समारंभाच्या अनुसंघाने लेखक मा.ल.धुळध्वज यांनी प्रकाशनक अप्पाराव मैन्द यांना एक छोटीशी सुंदर बुद्धमूर्ती देऊन आणि मुद्रक बंडु वानखेडे यांचा शाल-पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.लेखक मा.ल.धुळध्वज यांचाही सत्कार चार्वाक व्यवस्थापनाने आणि त्यांच्या माॕर्निंग गृप मित्रमंडळांनी केला. उत्तमराव जाधव यांनी केलेल्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here