🔹शेकडो विद्यार्थी व गावकऱ्यांना मिळाला दिलासा !
✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मोर्शी(दि.16जानेवारी):- तालुक्यातील दापोरी येथून श्री क्षेत्र सालबर्डी येथे जाण्याकरिता नवीन मार्गाचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र याच रस्त्याच्या एका बाजूला जिल्हा परिषद शाळा तर दुसऱ्या बाजूला लालदासस्वामी विद्यालय असून बाजूला गुरुदेव सेवा मंडळ प्रार्थना मंदिर आहे. हा रस्ता वर्दळीचा असल्याने वाहनेही भरधाव वेगाने येत असतात. भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे विद्यार्थ्यांना शाळेसाठी रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत असल्याने येथे गतिरोधक असावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी रेटून धरली होती.
तीन हजार वस्तीच्या दापोरी गावातून गेलेल्या दापोरी सालबर्डी मार्गावर वाहनाची वर्दळ मोठ्या प्रमाणात राहत असल्यामुळे दापोरी गावातील शेकडो विद्यार्थ्यांना या मार्गावरून शाळेमध्ये येणे जाणे करावे लगत असून दापोरी येथील शालेय विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गावच्या मुख्य रस्त्यावरील जिल्हा परिषद शाळा, लालदासस्वामी विद्यालय, गुरुदेव सेवा मंडळाजवळ तातडीने गतिरोधक बसविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी आमदार देवेंद्र भुयार, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडे दापोरी येथे स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी रेटून धरली होती.
या गंभीर प्रकाराची दखल घेऊन आमदार देवेंद्र भुयार, यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी अमरावती यांना दापोरी, सालबर्डी, पाळा येथे तत्काळ स्पीड ब्रेकर बसविन्याचे निर्देश दिल्यामुळे दापोरी, सालबर्डी, पाळा येथे स्पीड ब्रेकर बसविण्यात आले असून दापोरी, पाळा, सालबर्डी येथील विद्यार्थ्यांना व नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
दापोरी गावामध्ये केवळ गतिरोधक नसल्याने गावकरी व शेकडो पालकांच्या चिंतेत भर पडली होती. पालकांच्या रोषाला सामोरे जाण्याआधी संबंधित विभागाने आमच्या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन त्यावर उपाययोजना करण्याची मागणी रेटून धरल्यामुळे दापोरी गावामध्ये गतिरोधक बसविण्यात आले असून विद्यार्थ्यांना व पालकांना दिलासा मिळाला आहे. — रुपेश वाळके ग्राम पंचायत सदस्य.




