Home Breaking News सिरसदेवी येथे सशस्त्र दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांनी एकावर केला चाकू हल्ला

सिरसदेवी येथे सशस्त्र दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांनी एकावर केला चाकू हल्ला

209

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.15जानेवारी):-सशस्त्र दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांना गावकऱ्यांनी पळून लावलंय. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामधील सिरसदेवी येथे ही घटना घडलीय. सिरसदेवी फाट्यावर भारत भोंगे यांच्या घरावर रात्रीच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र हल्ला केला. यामध्ये भारत भोंगे यांच्या वडिलांच्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर दरोडेखोर त्या ठिकाणावरून पसार झाले. त्यांनी अन्य दोन ठिकाणी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावातील नागरिक जागे झाल्याने या दरोडेखोरांना गावातून पळ काढावा लागला. या दरोडेखोरांचा पोलीस शोध घेत आहेत.

(दि,१४ जानेवारी) रोजी मध्यरात्री एका घराला टार्गेट करुन दरोडेखोरांनी खुसखोरी केली. दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असताना दरोडेखोरांना रोखणाऱ्या एकावर त्यांनी चाकुहल्ला केला. आरडाओरडा झाल्यानंतर तेथून पळ काढत दरोडेखोरांनी दुसऱ्या घराला टार्गेट केले. मात्र, तेथीलही लोक जागे झाल्याने दरोडखोरांनी पळ काढला. यावेळी ग्रामस्थांची त्यांचा पाठलाग केला. मात्र, त्यांनी एका सिताफळाच्या बागेत घुसून पोबारा केला. ही धरारक घटना (दि,१४ जानेवारी) रात्री गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे घडली. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी आले. गेवराई तालुक्यातील सिरसदेवी फाटा येथे भारत भोगे हे आपल्या कुटंबासहीत राहतात. रात्री दीडच्या दरम्यान यांच्या रुक्मिणी या निवास्थानी घराच्या मागील गेटवरून उडी घेत आतमधील गेटचे लॉक तोडत घरात खुसखोरी केली. दरोडा टाकण्याचा प्रयत्नात असतानाच भारत भोगे यांचे वडील सूर्यकांत भोगे जागे झाले अन् दरोडेखोरांना विरोध केला.

यावेळी त्यांच्यावर दरोडेखोरांनी चाकू हल्ला केला. या हल्ल्यात भोगे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रगणालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी आरडा ओरड केल्याचे दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. त्यानंतर दरोडेखोरांनी आपला मोर्चा दुसऱ्या ठिकाणी वळविला. मात्र तेथील नागरिक सतर्क झाल्याने दरोडेखोरांनी तेथूनही पळ काढला. स्थानिकांनी पाठलाग केल्यानंतर दरोडेखोर तेथील रूई कॉर्नर नजिक एका घराच्या मागे दडलेले होते. अपल्या मागावर ग्रामस्थ असल्याचे त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी वक्ते वस्ती या ठिकाणी असलेल्या भागवत भोसले यांच्या सीताफळाच्या बागेचा आडोसा घेत तेथून पोबारा केला. याची माहिती तलवडा पोलिसांना मिळाल्यानंतर यांनी भोगे यांच्या घरी भेट देत पंचनामा केला. या धरारक घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून येथे बंदोबस्त देण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here