Home महाराष्ट्र छत्रपती शिवरायांवर स्वराज्य संस्कार राजमाता जिजाऊंचाच : गौतम पगारे

छत्रपती शिवरायांवर स्वराज्य संस्कार राजमाता जिजाऊंचाच : गौतम पगारे

111

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी येवला)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.13जानेवारी): – राजमाता जिजाऊ यांच्या चारित्र्य,शील,मानवतावादी,वैज्ञानिक, धर्मनिरपेक्ष,स्वराज्य संस्कारातून छत्रपती शिवराय घडले,अवघ्या सोळाव्या वर्षात बाल शिवाजीच्या मन,मनगट,मेंदूची घडण जिजाऊ माँ साहेबांनी केली याचा आदर्श आजच्या माता भगिनींनी घेणे गरजेचे असून सोळाव वरीस धोक्याचं नाही तर मोक्याच असतं हे माँ जिजाऊने ओळखलं होतं.

शिवरायांवर स्वराज्य संस्कार त्यानीच केले असे उदगार येथे आयोजित राजमाता जिजाऊ जयंती अभिवादन कार्यक्रमात जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गौतमभाऊ पगारे यांनी व्यक्त केले.सुरेश खळे,दिलीप मोहरे,महेंद्र पगारे आदी मान्यवर ह्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ललित भांबारे तर सूत्रसंचालन राजरत्न वाहूळ यांनी केले.साहिल जाधव ,रोहित गरुड,कुणाल ठाकरे,निलेश महाले,ओम पठाडे,तथागत अहिरे,शुभम मोरे,अजित काळे,प्रमोद वाघ,जीवन दळे,पंकज घुले आदी ह्यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here