
✒️जालना(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
जालना(दि.11जानेवारी):- वंचित बहुजन आघाडी सुध्दा निवडणूका निवडून येणारा पक्ष आहे असे भारतीय बौध्द महासभेचे जालना जिल्हा संघटक प्रशिक सम्राट यांनी जालना जिल्हा संपर्क कार्यालय येथील स्वागत समारंभ कार्यक्रमात प्रतिपादन केले.
नुकत्याच जालना जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हा महासचिव प्रा. संतोष आढाव यांची नुकतीच सावरगाव हडप ग्रामपंचायत सदस्य पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे जाहीर झालेल्या सावरगाव हडप ग्रामपंचायत कार्यकारणीत प्रा. संतोष आढाव त्यांची सर्वानुमते वंचितच्या वाघाची बिनविरोध निवड करण्यात आली त्यांच्या या निवडीमुळे सर्वत्र अभिनंदनचा वर्षाव होत आहे. आमचे मार्गदर्शक सर्व सर्वा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख सन्माननीय मा. खासदार ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार तथा जालना जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आद. डेव्हिड घुमारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनंदन सत्कार सोहळा घेण्यात आला होता.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक प्रशिक सम्राट यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन प्रा. संतोष आढाव यांची भेट घेतली बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे फुलगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. व पुढच्या वाटचालीसाठी व विधायक कार्यासाठी त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित सन्माननीय जिल्हाध्यक्ष पश्चिम डेव्हिड घुमारे साहेब. आयुष्यमती मीना पाचगे जिल्हा महासचिव महिला विभाग. रमाताई होरशीळ जिल्हाध्यक्ष महिला विभाग. भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक प्रशिक सम्राट. अकबर इनामदार जिल्हा उपाध्यक्ष. इजास मौलाना शहर उपाध्यक्ष. प्रशांत कसबे जिल्हा महासचिव उपस्थित होते.
