✒️साकोली(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
साकोली(दि.9जानेवारी):- साकोली शहरात चक्क ६ दिवसांपासून नळाला पाणी नसल्याने प्रत्येक प्रभागातील महिलांचा आक्रोश गगनाला भिडला असतांनाच दि. ०९ जानेवारीला नगरपरीषद कार्यालयात जाऊन येथील फ्रिडम युथ फाऊंडेशन, शिवसेना – महाराष्ट्र वाहतूक सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा कडून तातडीने पाणी पुरवठा सुरू करण्यात यावा असे पत्रकांतून निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळाने हजर अधिकारी स्वपनिल हमाने यांचेशी चर्चा केली असता सांगितले की पाणीपुरवठा लाईन ही जूनी असून त्याचा संकीर्ण वॉल व थेड्स बेयरींग नागपूर वरून बोलविले आहे व लवकरच पाणी पुरवठा सुरू होणार.
यावर शिवसेना, राष्ट्रवादी व फ्रिडमने सवाल केला की तात्काळच उपाययोजना का केली नाही ०६ दिवसांपासून महिलांनी कसा त्रास भोगला तर आता अतितात्काळ १२ तासात नळाला पाणी पाहिजे असे स्वाक्ष-यांसह निवेदन सादर केले.
साकोली शहरातील ग्रामिण पाणी पुरवठा योजना अंतर्गत नळ असून मागील ०६ दिवसांपासून नळाला पाणी येणे बंद झाले आहे.माहितीनुसार या पाणी टंकी संदर्भात वॉल खराब झाला आहे. या प्रकाराने दररोज महिलांचा नगरपरीषदेविरोधात आक्रोश गगनाला भिडला होता. यातच सोमवार ०९ ला. येथील फ्रिडम युथ फाऊंडेशनचे किशोर बावणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आशिष गुप्ता, स्वामी नेवारे, राजेश मेश्राम, राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्या लता द्रुगकर, रंजना मके, बसपा साकोली विधानसभा अध्यक्ष स्वपनिल गजभिये आणि शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे तालुका अध्यक्ष महेश पोगळे, शहर प्रमुख गजेंद्र लाडे, उपतालुका प्रमुख जितेंद्र ऊईके, उपजिल्हा संघटीका प्रतिभा पारधी, उपतालुका प्रमुख स्नेहा मेश्राम व अन्य नागरीकांच्या स्वाक्ष-यांसह नगरपरीषदेमध्ये पाणी पुरवठा त्वरीत सुरू करण्यासाठी निवेदन देण्यात आले.




