Home महाराष्ट्र सारजाई कुडे व बालकवी ठोंबरे विद्यालयाची कु.श्रद्धा मांडगे चा गौरव

सारजाई कुडे व बालकवी ठोंबरे विद्यालयाची कु.श्रद्धा मांडगे चा गौरव

110

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)

धरणगाव(दि.9जानेवारी):- जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ विद्या समितीमार्फत घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धेमध्ये जिल्हास्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत कु. श्रद्धा मांडगे या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक मिळवला.

तिचे नीलकंठ गायकवाड, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जे के पाटील,पदाधिकारी परीक्षा समितीचे सचिव व सारजाई कुडे विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.एस.पाटील, अनोरे विद्यालयाचे मुख्याध्यापक एम एच चौधरी व अन्य मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

तिच्या यशाबद्दल प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक जीवन पाटील सर सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले.याच स्पर्धेत प्राथमिक गटातून वेदांत शिंदे यानेही उत्कृष्ट वक्तृत्व करून पर्यवेक्षक यांची मने जिंकली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here