मराठा सेवा संघ नसता तर….
तर मी काय असतो…?
आम्ही मराठा कुणबी तेली माली मुस्लीम…पोरं
धर्मांध होवून एकमेका कापत असतो…
लेखनीला शस्त्र मानलं नसतं…
पुस्तक हाती धरलं नसतं…
शिक्षण सोडून अंधश्रद्धा जपत असतो…
भ्रामक कल्पनावर अंधारमय जीवन जगत असतो…
कर्मकांडावर सारी कमाई घालवत असतो…
दारिद्र्याच्या खायीत खितपत पडलो असतो…
चोऱ्या मारामाऱ्या खून असले अपराध झेलत असतो…
खोट्या इतिहासाला बळी पडलो असतो…
आपल्याच महापुरुषांना विसरलो असतो…
सत्य असत्याची चिकित्सा करत नसतो…
खरा इतिहास जाणत नसतो…
कोणी सांगेल तिकडे सुसाट पळत असतो…
त्यांच्या सांगण्यावरुन माझ्याच उद्धारकर्त्याचे मुडदे पाडत असतो…
सोन्यासारखं आयुष्य जेलमध्ये सडवत असतो…
आपल्या कुटुंबाला देशोधडी लावत असतो…
गुलाम म्हणून जनावराच जीनं जगत असतो…
एवढं सारं कोणी केलं नसतं…
ते पुरुषोत्तम खेडेकर नावाच्या मसीहानं केलं…
त्यांना मी त्रिवार वंदन करतो…
✒️ रामचंद्र सालेकर(९५२७१३९८७६)वरोरा,चंद्रपूर.