✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
__________________________
पुसद(दि.9जानेवारी):-महाराष्ट्र राज्यातुन शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी परीक्षेत राज्याची मेरिट लिस्ट नुकतीच जाहीर झाली. जेट किड्स इंटरनॅशनल स्कूल ,पुसद येथे शिकणारी कु.स्वरा पवन बोजेवार हिचा राज्याच्या मेरिट लिस्ट मध्ये अकरावा क्रमांक आला आहे आणि जिल्ह्याच्या यादीत तीने दुसरा क्रमांक पटकावला आहे. ह्याशिवाय कु.स्वरा हिने होमी भाभा बालविज्ञानिक परीक्षेत सुद्धा यश संपादन केले आहे.
स्वरा ही अभ्यासात हुशार तर आहेच परंतु स्केटिंग आणि चेस मध्ये देखील तिने जिल्हास्तरीय आणि विभागस्तरीय मध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे.तिच्या या यशात तिला मार्गदर्शन करणारे जेट किड्स इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक, ज्ञानदीप अकॅडमी आणि सौ.वाडीकर मॅडम यांचा सहभाग आहे.तिच्या यशाबद्दल शिक्षणाधिकारी सूर्यवंशी, गटशिक्षणाधिकारी कोंडावार, शाळेचे प्राचार्य आणि सर्व शिक्षकवृंद यांनी शुभेच्छा दिल्या.