Home Breaking News अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा सहा दिवसांनी मृत्‍यु

अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा सहा दिवसांनी मृत्‍यु

215

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.8जानेवारी):-अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका युवकाचे शुक्रवारी (दि.6) पहाटे पाच वाजता निधन झाले. सहा दिवसापासून तो औरंगाबादच्या खाजगी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत होता. याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, श्रीक्षेत्र नारायण गडावर दर्शनासाठी दुचाकीवरून जात असताना 1 जानेवारीला दुपारी दोनच्या सुमारास त्यांच्या गाडीला पाठीमागून भरधाव वेगात चार चाकी गाडीने धडक दिली होती.

या अपघातात काकडे भैय्या ( वय वर्ष 21 ) हा युवक जागीच ठार झाला होता. सुनिल प्रभाकर हातागळे ( वय वर्ष 21 ) हा युवक गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी बीडहून औरंगाबाद येथे एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

दरम्‍यान, ताे सहा दिवस मृत्युशी झुंज देत हाेता. अखेर, शुक्रवारी त्‍यांचे निधन झाले. सुनिलचे दोन महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. त्याच्या मृत्युने हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here