Home महाराष्ट्र माण खटावच्या जनतेच्या आशिर्वादामुळेच अपघातातून सुखरूप बचावलो,माझा पुनर्जन्म झाला : आ.जयकुमार गोरे

माण खटावच्या जनतेच्या आशिर्वादामुळेच अपघातातून सुखरूप बचावलो,माझा पुनर्जन्म झाला : आ.जयकुमार गोरे

118

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.7जानेवारी):-भाजपाचे सातारा जिल्हाध्यक्ष,माण खटावचे आमदार जयकुमार गोरे नागपूर हिवाळी अधिवेशनातुन मतदारसंघात परतत असताना दिः२४ डिसेंबर रोजी पहाटे ३ः०० च्या सुमारास चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने फलटण जवळील मलठण पुलावरुन त्यांची फाॅर्चुनर गाडी एम एच.११ बी ए.०१०० कठडा तोडून नदीपात्रात कोसळली.यात दैव बलवत्तर म्हणून ५०-६० फुट खोल नदीपात्रात कोसळूनही आ.गोरेंसह त्यांचा चालक,अंगरक्षक व स्वीय सहाय्यक जखमी झाले.त्यांना प्रथमोपचार फलटण येथे करुन पुढील उपचाराकरीता पुण्यातील रुबी हाॅल क्लिनीक येथे दाखल करण्यात आले.

अपघाताची बातमी समजताच मतदारसंघासह संपुर्ण महाराष्ट्रातून असंख्य कार्यकर्ते,नेतेमंडळी हाॅस्पिटलकडे धाव घेत होते.यावेळी डाॅ.झिरपे यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास घेतला.ते उपचारास प्रतिसाद देत असल्याने डाॅ.कपील झिरपे यांनी प्रकृती उत्तम असून काळजी न करण्याचे आवाहन केले.

आ.गोरे यांनी ५ दिवस अतिदक्षता विभागात उपचार घेतल्यानंतर दिः२९ डिंसेबर रोजी सामान्य कक्षात दाखल करण्यात आले.त्यानंतर आ.गोरे यांच्या पत्नी सौ.सोनिया गोरे यांनी हाॅस्पिटल परीसरात गर्दी न करण्याचे आवाहन केले.दरम्यान उपमुख्यंमत्री ना.देवेंद्र फडणवीस,राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा.शरद पवार,भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील,महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,आरोग्यमंत्री तानाजी सावंत,उत्पादनशुल्क मंत्री शंभुराज देसाई,खा.श्री.छ.उदयनराजे भोसले,खा.रणजितसिंह ना.निंबाळकर,चित्रा वाघ,राज्यमंत्री रुपाली चाकणकर,खा.संजय पाटील,आ.राहुल कुल,आ.गोपीचंद पडळकर व सर्व आजी-माजी आमदार,खासदार,मंत्री यांनी भेट घेऊन तब्बेतीची विचारपुस केली.

तब्बेतीत सुधारणा झाल्याने आ.गोरे यांना दिः५ जानेवारी रोजी डिस्चार्ज देण्याच्या आला.यावेळी त्यांना हॅलिकाॅप्टरमधून मतदारसंघातील त्यांच्या बोराटवाडी ता.माण येथील निवासस्थानी आणण्यात आले.यावेळी निवासस्थान परिसर रांगोळी ,फुलांनी सजवण्यात आला होता.कार्यकर्ते,कुटुंबीयांचे प्रेम,आपुलकी पाहून ते भारावून गेले.

यावेळी बोलताना ते म्हणाले,तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाने मी गंभीर अपघातातून सुखरूप बजावलो,माझा पुनर्जन्म झाला.’इथून पुढचा जयकुमार तुमच्या सेवेसाठी असेल,न विचार करता काम करेन.असेही ते म्हणाले.या छोटेखानी कार्यक्रमात भाजपा तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.तर अंकुशभाऊ गोरे,सौ.सोनिया गोरे,भगवानराव गोरे,सभापती विलासराव देशमुख,दादासाहेब काळे,अर्जुनतात्या काळे,अतुल जाधव,धनाजीराव जाधव,सिध्दार्थ गुंडगे,प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी,प्र.तहसीलदार श्री.व्हट्टे,स.पो.नि.अक्षय सोनवणे व इतर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here