Home Breaking News सोनारांचे दुकान फोडून अडीच लाख रुपयांचे सोन्या,चांदीसह रोख रक्कम लंपास

सोनारांचे दुकान फोडून अडीच लाख रुपयांचे सोन्या,चांदीसह रोख रक्कम लंपास

60

🔹तीन चोरटे सी.सी.टीव्ही.कॅमेंऱ्यात कैद

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
___________________________
पुसद(दि.6जानेवारी):-शहर पोलीस स्टेशन पासून जवळच असलेल्या मुख्य बाजारपेठेतील सराफा लाईनमध्ये तीन सोन्या चांदीचे दुकाने फोडल्याचा धक्कादायक प्रकार दि.५ जानेवारी ते २०२३ रोजीच्या सकाळी उघडकीस आला आहे. सोन्या चांदीचे तीन दुकाने फोडून जवळपास अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.चोरटे व त्यांची दुचाकी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून अज्ञात चोरट्या विरोधात शहर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पुसद शहरातील सराफा बाजारातील तीन सोनारांचे दुकान दुचाकी वर आलेल्या चोरट्यांनी फोडून दुकानातील सोन्या-चांदीसह नगदी रक्कम लंपास केल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली. अज्ञात तीन चोरट्यांनी एकाच ठिकाणी असलेल्या धोबे सुवर्णकारचे मालक भागवत रघुनाथराव धोबे रा. हटकेश्वर वार्ड याचे दुकान फोडून १ एक लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.तर अतिष रामराव धोबे रा.तेलगु वसाहत यांचे दुकान फोडून ८५ हजार रुपये रोख व ३२ हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले आहे.

त्या सोबतच विनोद रामदास धोबे रा.उदासी वार्ड यांचे दुकान फोडून ४ हजार ५०० रूपये नगदी व पाच हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले आहे.तर ऋषीकेश पंडीतकर यांचे सोन्याचे दुकान फोडण्याचा प्रयत्न झाला असता मात्र चोरट्यांना यश आले नाही. घटनेसंबंधी आतिश रामराव धोबे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुध्द पुसद शहर पोलिसांनी भादवीचे कलम 457 380 नुसार गुन्हे दाखल करून पोलीस उप निरीक्षक उल्हास परांडे यांनी पुढील तपासास सुरुवात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here