Home नागपूर कल्पना साबळे ‘मिसेस महाराष्ट्र क्लासिक

कल्पना साबळे ‘मिसेस महाराष्ट्र क्लासिक

155

🔸गुरुग्राम येथील ‘मिसेस इंडिया ऑन इन अ मिलियन’ स्पर्धेत गौरव

✒️नागपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नागपूर(दि.5जानेवारी):- हरियाणातील गुरुग्राम येथे नुकत्याच पार पडलेल्या मिसेस इंडिया वन इन अ मिलियन ब्युटी पिजंट स्पर्धेत नागपुरातील कल्पना साबळे यांना ‘मिसेस महाराष्ट्र क्लासिक’ हा किताब प्राप्त झाला.

गुरुग्राम येथील हॉटेल क्राऊन प्लाझा येथे आयोजित अंतिम स्पर्धेत पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. सदर स्पर्धेत संपूर्ण भारतातून 70 स्पर्धक सहभागी झाले होते. वर्षभर चाललेल्या निवड चाचणीच्या विविध टप्प्यातून या स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती.

कल्पना साबळे स्पर्धेतील संपूर्ण टप्पे पार करत अंतिम फेरीत ‘मिसेस महाराष्ट्र क्लासिक’ हा मानाचा मुकुट पटकाविला. या पुरस्कारांसह ‘बेस्ट नॅशनल कॉस्टयूम’ अर्थात उत्कृष्ट राष्ट्रीय पेहराव आणि ‘बोल्ड अँड ब्युटीफुल’ या पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले. वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, नागपूर येथे व्यवस्थापक पदावर कार्यरत नंदकिशोर साबळे यांच्या त्या पत्नी होत. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here