Home महाराष्ट्र धरणगाव येथील माळी समाज पंच मंडळातर्फे सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन

धरणगाव येथील माळी समाज पंच मंडळातर्फे सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन

115

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)

धरणगाव(दि.4डिसेंबर):-येथील मोठा माळी वाडा व लहान माळी वाडा पंच मंडळाच्या वतीने मोठा माळीवाडा येथील सावित्रीमाई फुले चौक या ठिकाणी प्रतिमापूजन स्थानिक महिलांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यानंतर धरणी चौकातील राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पूर्णाकृती स्मारकाजवळ सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन माजी नगराध्यक्षा उषा वाघ, पुष्पा महाजन, उपनगराध्यक्ष कल्पना महाजन, सुरेखा महाजन, अंजली विसावे, प्रा. कविता महाजन, संगीता माळी, अंगणवाडी सेविका कल्पना महाजन, आशा माळी, राजश्री महाजन या महिला भगिनींच्या शुभहस्ते पूजन व माल्यार्पण करण्यात आले.

याप्रसंगी मोठा माळीवाडा माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा महाजन व लहान माळीवाडा अध्यक्ष रामकृष्ण महाजन तसेच शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, भाजप ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष संजय महाजन, नगराध्यक्ष नीलेश चौधरी, चर्मकार महासंघांचे भानुदास विसावे, धर्मराज मोरे, माळी समाज उपाध्यक्ष निंबाजी महाजन, तुळशीराम जाधव, सचिव गोपाल महाजन, कोषाध्यक्ष व्ही.टी.माळी, आर.डी.महाजन, दशरथ महाजन, डिगंबर माळी, सुखदेव महाजन, नगरसेवक कैलास माळी, विजय महाजन, भागवत चौधरी, विलास महाजन, आदी उपस्थित होते.

या प्रसंगी पत्रकार रवी महाजन, संतोष महाजन, अनिल महाजन, अमोल महाजन, नितेश वाघ, म.फुले ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी. राजेंद्र महाजन, कुणाल महाजन, भिका महाजन, जयेश महाजन, विलास माळी, राजू माळी, हेमंत माळी, विनायक माळी, रामचंद्र महाजन, योगेश महाजन, जिभाऊ महाजन हजर होते. सूत्रसंचालन व आभार समाजाचे कोषाध्यक्ष व्ही.टी.माळी यांनी मानले, कार्यक्रमाची प्रस्तावना प्राध्यापिका कविता महाजन यांनी केले. मोठा माळीवाडा येथील फुलमाळी चौकात प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कैलास माळी, जनार्दन माळी व कांतीलाल माळी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here