Home चंद्रपूर अथर्व खोब्रागडे चंद्रपूर जिल्ह्यात शहरी विभागातून प्रथम मेरिट

अथर्व खोब्रागडे चंद्रपूर जिल्ह्यात शहरी विभागातून प्रथम मेरिट

185

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.4जानेवारी):-शैक्षणिक सत्र २०२२ मध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे मार्फत घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत बालविकास प्राथमिक शाळा मूलचा विद्यार्थी असलेल्या अथर्व लक्ष्मण खोब्रागडे याने ८३.२२% गुण प्राप्त करून चंद्रपूर जिल्याच्या शहरी विभागातून प्रथम मेरिट प्राप्त केली आहे .

अथर्व लक्ष्मण खोब्रागडे हा बालविकास प्राथमिक शाळा मूल या मराठी माध्यमाच्या शाळेचा विद्यार्थी असून त्याच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता बूटे , मार्गदर्शक शिक्षक ललित लांजेवार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले . त्याचबरोबर मार्गदर्शन करण्यासाठी संतोष सोनवाणे , सचिन बल्लावार , ज्ञानेश्वर ननावरे , विवेक हरमवार , शिल्पा कापसे , कविता खोब्रागडे यांनी मोलाची भूमिका बजावली . अथर्वच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन करण्यात आले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here