Home महाराष्ट्र नगर परीषद कडून ४ कोटी ७० लाख ३८ हजार रुपयांवर प्रती महिना...

नगर परीषद कडून ४ कोटी ७० लाख ३८ हजार रुपयांवर प्रती महिना २ टक्के व्याज आकारणीला सुरुवात

87

🔹वर्षाकाठी ३ कोटी ६४ लाख ७४ हजार २१० रुपयाची वसुली

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
____________________________
पुसद(दि.4जानेवारी):- नगरपालिका मार्फत मालमत्ता करदात्यांकडून ८ कोटी ३५ लाख १३ हजार ८१ रुपयाची एकत्रित कराची मागणी केली होती. त्यापैकी करदात्यांनी केवळ ३ कोटी ६४ लाख ७४ हजार २१० रुपयाची वसुली वर्षाकाठी करण्यात आली आहे. तर पाणीपुरवठा विभागाकडे केवळ ३०.६२ टक्के नळ कनेक्शन धारकांनी थकीत बिलाचा भरणा केला आहे.

नगर पालीकेच्या हद्दीतील करदात्यांना वारंवार सूचना देऊन देखील कराची रक्कम भरली नाही. परिणामी दि.१ जानेवारी २०२३ पासून प्रति महिना २ टक्के व्याजदराने कराची आकारणी केली जाणार आहे.

नगरपरिषदेच्या हद्दीत घरगुती नळ कनेक्शनची धारकाची संख्या ७ हजार ९२५ असुन व्यावसायिक नळ धारकांची संख्या १६६ आहे.तर नगरपालिकेने दि.३१ डिसेंबर २०२२ पर्यंत १ हजार २९३ कनेक्शन बंद केले आहे.मागील वर्षी नळ धारकाकडे १ कोटी ६२ लाख ६१ हजार ५२७ मागणी केली होती. त्यापैकी नळ कनेक्शन धारकांनी ६१ लाख २५ रुपये भरले होते. मागील वर्षीच १ कोटी ४ लाख ६१ हजार ५०२ रुपये थकीविले आहे.तर यंदाच्या वर्षी ३ कोटी १४ लाख ६० हजार ३२२ रूपये नळ कनेक्शन धारकांना दि.३१ डिसेंबर २०२२ पर्यंत थकीत कराची मागणी केली असता ८६ लाख १८ हजार ४१७ रूपये नळ कनेक्शन धारकांनी जमा केले आहे.

यंदाच्याही वर्षी करदात्यांनी नळाचे २ कोटी २८ लाख ४१ हजार ९०५ रूपये थकविले आहे.न.प.ने एकूण ४ कोटी ८० लाख ६१ हजार ८४९ एकत्रित मागणी केली असता १ कोटी ४७ लाख १८ हजार ४४२ रूपयांची वसुली झाली आहे.न.प.च्या पाणीपुरवठा विभागाकडे केवळ ३०.६२ टक्केच वसुली झाली आहे.न.प. क्षेत्रातील सर्व मालमत्ता धारकांकडे सन २०२२ – २०२३ करिता एकत्रीत मालमत्ता कराच्या ३ कोटी २७ लाख ५० हजार ३५७ रूपये व चालु वर्षांकरिता एकत्रीत मालमत्ता कराची ५ कोटी ७ लाख ६२ हजार ७२४ रूपये अशी एकुण ८ कोटी ३५ लाख १३ हजार ८१ रूपयाची मागणी होती.त्या पैकी दि. ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत एकत्रीत मालमत्ता कर १ कोटी ७१ लाख ६६ हजार २३५ रूपये व चालु वर्षांकरिता १ कोटी ९३ लाख ७ हजार ९७५ रूपये असे एकुण ३ कोटी ६४ लाख ७४ हजार २१० रूपये असे एकत्रीत मालमत्ता कर वसुल करण्यात आले आहे. नगरपालिकेच्या हद्दीतील मालमत्ता धारकाकडे अजूनही ४ कोटी ७० लाख ३८ हजार ८७१ रुपये थकविले आहे.त्यामुळे मालमत्ता धारकांना दि. १ जानेवारी २०२३ पासून दोन टक्के व्याजाने आता रक्कम भरावी लागणार आहे.

बॉक्स व्याज आकारणी बाबत असा झाला होता निर्णय एकत्रीत मालमत्ता करावर दि.१ एप्रिल २०२२ पासून महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचाती तथा औद्योगीक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १५० (अ) नुसार प्रती महिना २ टक्के प्रमाणे शास्ती आकारणत येत आहे. त्या अनुषंगाने दि.३१ डिसेंबर २०२२ अखेर पुसद न.प.ने २० लाख ४८ हजार ५६० रूपये शास्ती वसुल करण्यांत आली होती. तसेच अधिनियमातील तरतुदीनुसार चालु एकत्रीत मालमत्ता कर मागणीवर सुध्दा दि.१ जानेवारी २०२३ नंतर प्रती महिने २ टक्के शास्ती कारण्यात येत आहे.

कोट बॉक्स ज्या मालमत्ता धारकांनी त्यांचे मालमत्तेवरील कराचा भरणा केला आहे.त्या नुसार शहराच्या विकासास सहकार्य केला आहे. त्यांचे आभार व्यक्त करतो.तसेच आव्हान करतो की, ज्या मालमत्ता करधारकांनी त्यांचे मालमत्तेवरील थकीत व चालु एकत्रीत मालमत्ता कराचा भरणा अद्यापावेतो केला नाही. त्यांनी त्वरीत भरणा करून त्यांचे मालमत्तेवरील वाढणारी शास्ती टाळावी व आपले मालमत्तेवरील एकत्रीत मालमत्ता कराचा भरणा करून नगर परिषदेला शहराचा विकास करण्याकरिता सहकार्य करावी.-डॉ. किरण सुकलवाड, मुख्याधिकारी,न.प. पुसद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here