Home महाराष्ट्र कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांची गंगाखेड पोलीस ठाण्याच्या पुन्हा नेमणूक

कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांची गंगाखेड पोलीस ठाण्याच्या पुन्हा नेमणूक

126

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.2जानेवारी):-पोलीस ठाण्याच्या लेडी सिंघम अशी जनतेच्या मनात भावना निर्माण करणाऱ्या तसेच गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरलेल्या वसुंधरा बोरगावकर यांची गंगाखेड पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षकपदी पुन्हा नेमणूक करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई खंडपीठ औरंगाबाद (मॅट) च्या आदेशानुसार परभणीच्या जिल्हा पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांनी त्यांच्या नियुक्तीचे आदेश दिले आहेत.

कोरोना काळात वसुंधरा बोरगावकर यांनी चांगली कामगिरी केली होती. त्याचबरोबर गुन्हेगारीवर वचक मिळविण्यात त्यांनी यश मिळवले होते. मात्र, मध्यंतरी बोरगावकर यांची तत्कालीन पोलीस अधीक्षकानी पोलीस नियंत्रण कक्षात बदली केली होती. त्याविरुद्ध बोरगावकरांनी मॅट औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली होती.

यावर १३ नोव्हेंबररोजी मॅटने बोरगावकरांच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर बोरगावकरांना पुन्हा गंगाखेड पोलीस ठाण्यात प्रभारी पोलीस अधिकारी म्हणून रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. तर गंगाखेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील किशन माने यांची पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here