Home महाराष्ट्र उमरखेड येथे टेनिस बॉलचे खुले सामने सुरू

उमरखेड येथे टेनिस बॉलचे खुले सामने सुरू

120

🔸सर्व क्रिकेट प्रेमी यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं – गोपालभाऊ अग्रवाल (उद्घाटक)

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.1जानेवारी):-शहराला लागून असलेले बिटरगाव (आबादी) रोडवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम (खरब मैदान) या मैदानावर टेनिस बॉल च्या क्रिकेट खुले सामन्याचे उद्घाटन गोपालभाऊ अग्रवाल यांनी करून सर्व क्रिकेट प्रेमी यांना या खुल्या सामन्यांमध्ये सहभागी व्हावं असे आव्हान यावेळी केले.

या उद्घाटन सोहळ्याला सोनूभाऊ खतीब, बाबुभाई हिना,जुबेर कुरेशी, अहमदभाई,गणेशभाऊ रावते, जलील कुरेशी, सुशीलभाऊ ठाकूर, शाहरुख पठाण, मुफ्ती आवेद, बबलू हिना, हे सर्व उपस्थित होते.

या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन उमरखेड एकता क्रिकेट क्लबच्या सर्व आयोजकांच्या वतीने स्वागत करण्यात आले.तसेच तातू देशमुख यांनी सुद्धा या उद्घाटन समारंभाला हजेरी लावली.या स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस 31 हजार रुपये गोपाल भाऊ अग्रवाल सोनूभाऊ खतीब, द्वितीय बक्षीस 21हजार रुपये बाबुभाई हिना, अहमद भाई तर तृतीय बक्षीस 11 हजार रुपये जुबेरभाई कुरेशी यांनी दिले आहेत.

तर या सामन्याचे आयोजन एकता क्रिकेट क्लब उमरखेड प्रफुल दिवेकर, मोहम्मद इम्रान, नितिन आठवले, अन्सार अहमद, सिध्दार्थ दिवेकर, तौसीब शम्स, शेख तौकिर यांनी केले आहे.यावेळी खेळाडू व क्रिकेट प्रेमी उद्घाटन समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here