Home चंद्रपूर उत्तर ब्रम्हपुरी / नागभिड वनपरिक्षेत्रामध्ये धुमाकुळ माजविणारी P-1 वाघीण जेरबंद

उत्तर ब्रम्हपुरी / नागभिड वनपरिक्षेत्रामध्ये धुमाकुळ माजविणारी P-1 वाघीण जेरबंद

173

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.2 जानेवारी):- वनविभागातील दिनांक 30/12/2022 रोजी नागभिड वनपरिक्षेत्रातील मौजा ईरव्हा येथील शेतशिवार परिसरात श्रीमती नर्मदा प्रकाश भोयर व दिनांक 31/12/2022 रोजी उत्तर ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील मौजा तोरगांव येथील सौ सिताबाई रामजी सलामे यांना P-1 वाघीणीने (मादी) हल्ला करून ठार केले होते.

त्यामुळे आज दिनांक 01/01/2023 रोजी उत्तर ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रांतर्गत ब्रम्हपुरी उपक्षेत्रातील तोरगांव

नियतक्षेत्रामध्ये (गट क्र. 60) डॉ. कुंदन पोडचलवार, पशुवैद्यकिय अधिकारी (वन्यजीव) TTC, ताडोबा अंधारी

व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर यांनी व बी. एम. वनकर, वनरक्षक (शुटर) यांनी P-1 (मादी) वाघीणीस अचुक निशाना साधून दुपारी 3.07 वाजता डार्ट केला व सदर वाघीण बेशुध्द झाल्यानंतर तीला दुपारी 3.32 वाजता पिंज-यात सुरक्षितरित्या बंदिस्त केले.

सदरची कार्यवाही श्री एम. बी. चोपडे, सहायक वनसंरक्षक (प्रादे व वन्य) ब्रम्हपुरी, श्री कैलास धोंडणे, सहायक वनसंरक्षक (तेंदू), श्री एम. बी. गायकवाड, वनक्षेत्रपाल (प्रा) उत्तर ब्रम्हपुरी, श्री आर. डी. शेंडे, वनक्षेत्रपाल (प्रा) दक्षिण ब्रम्हपुरी वनविभागाचे क्षेत्रिय अधिकारी / कर्मचारी, तसेच RRU, चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूरचे सदस्य श्री के. जी. डांगे, श्री एस. एस. पोईनकर, श्री अंकित पडगेलवार व श्री राकेश अहुजा (फिल्ड बायोलॉजिस्ट, ब्रम्हपुरी) यांचे उपस्थितीत पार पडली. जेरबंद करण्यात आलेल्या P-1 वाघीणीचे (मादी) वय अंदाजे दोन ते अडीच वर्षे असून त्याला पुढील तपासणीकरिता ट्रांझिट ट्रिटमेंट सेंटर, चंद्रपूर येथे स्थलांतरीत करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here