✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मुंबई(दि.1जानेवारी):-मराठी वृत्तपत्र लेखक संघ, महाराष्ट्र राज्य या प्रतिष्ठित संस्थेच्या वतीने वृत्तपत्र लेखक श्याम ठाणेदार यांना राज्यस्तरीय पत्र भूषण पुरस्कार २०२३ हा मानाचा पुरस्कार घोषित झाला आहे. संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांनी या बाबतची घोषणा केली आहे.
श्याम ठाणेदार हे मराठी वृत्तपत्र लेखक असून वर्तमानपत्रात ते कला, क्रीडा, साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, चालू घडामोडी अशा विविध विषयांवर नियमित लेखन करतात. मुंबईत ६ जानेवारी, पत्रकार दिनी मान्यवरांच्या हस्ते श्याम ठाणेदार यांना हा पुरस्कार मुंबईत दिला जाणार असून मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.