Home महाराष्ट्र मौजे तासवडे येथे विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न

मौजे तासवडे येथे विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न

63

✒️कराड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

कराड (दि.1जानेवारी):-“विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, श्रमाला व प्रतिष्ठेला न्याय मिळावा, संधी मिळावी यासाठी अशा प्रकारची शिबिरे विद्यार्थी जीवनात महत्त्वाची असतात कारण विद्यार्थी हे आपल्याच विश्वात रममान झालेले असतात. याच्या पलीकडचे जग त्यांना माहीत नसते. पण अशा प्रकारच्या शिबिरांमुळे विद्यार्थ्यांना घर सोडून, कॉलेज सोडून आपली माणसं सोडून बाहेर जाण्याची, राहण्याची संधी मिळते त्यातूनच अनेक गोष्टी शिकायला मिळतात. बाहेर कसे राहावे, कसे बोलावे, कसे वागावे ह्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करावा लागतो.

या गावात आयोजित केलेले हे शिबिर खूप महत्त्वाचे आहे कारण श्रमदानाच्या माध्यमातून गावामध्ये सहकाराचे वातावरण निर्माण होते.” असे प्रतिपादन कराड तालुका पंचायत समिती, कराडचे सभापती मा. प्रणव ताटे यांनी केले. ते वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडच्या कनिष्ठ विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमास श्री शिवाजी शिक्षण संस्था, विद्यानगर, कराडच्या उच्च शिक्षण मंडळ, विद्यानगर, कराडचे जनरल सेक्रेटरी मा. श्री प्रकाश पाटील (बापू) यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौजे तासवडे गावच्या सरपंच मा. सौ. भारती शिंदे या होत्या.

प्रमुख पाहुणे श्री प्रणव ताटे पुढे म्हणाले की, “तालुक्याच्या सभापती पदाची संधी मा. आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिल्याबद्दल मी अत्यंत समाधानी आहे. विद्यार्थ्यांना ग्रामीण भागाची संस्कृती लोकपरंपरा, लोकजीवन आणि लोककला कशा आहेत याची ओळख अशा शिबिरातून होते. गेल्या सात दिवसात स्वयंसेवकानी जे श्रमाचे संस्कार घेतले त्यातून पुढे त्यांच्या जीवनाला नवआकार येईल. राष्ट्रीय सेवा योजनेच्या या शिबिरामुळे तासवडे गावाला प्रेरणा प्राप्त होऊन त्यातून गावाचा विकास होईल. “

याप्रसंगी श्री शिवाजी शिक्षण संस्था, विद्यानगर कराडच्या उच्च शिक्षण मंडळ, विद्यानगर कराडचे जनरल सेक्रेटरी मा. श्री प्रकाश पाटील (बापू) म्हणाले की, “राष्ट्रीय सेवा योजनेमुळे आपल्याला खूप गोष्टी शिकायला मिळतात. स्वयंसेवकांवर जे संस्कार होतात तेच संस्कार पुढील आयुष्यामध्ये उपयोगी पडत असतात. या गावातील ग्रामस्थांनी मुलांना मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले त्याबद्दल अभिनंदन केले. अमित जाधव सिनेट सदस्य यांनी श्रमातून संस्कार महत्त्वाचे असतात आमच्या गावात येऊन आमच्या गावासाठी शिबिराच्या माध्यमातून अनमोल ठेवा दिला आहे. तो ठेवा आम्ही जतन करू अशी ग्वाही दिली. ग्रामविकास अधिकारी समाधान माने यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

या शिबिरामध्ये आलेले अनुभव कथन करताना राष्ट्रीय सेवा योजनेची विद्यार्थिनी सिद्धीका मुजावर व अनिरुद्ध शेजवळ यांनी अनुभव मांडले. या कार्यक्रमाचे अहवाल वाचन प्राध्यापक के .एस. महाले कार्यक्रम अधिकारी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल जी जाधव सत्कार केला व प्रास्ताविक केले .ह्या समारोपाचे सूत्रसंचालन व आभार प्रा पी एस सादिगले यांनी केले. प्रा यु .एस. मस्कर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापक ,प्राध्यापिका ,स्वयंसेवक प्रशासकीय कर्मचारी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here