Home महाराष्ट्र अहिल्यादेवी यांच्या नावाने आमदार पडळकरांनी दिले गंगाखेड ला 1 कोटी चा निधी*...

अहिल्यादेवी यांच्या नावाने आमदार पडळकरांनी दिले गंगाखेड ला 1 कोटी चा निधी* चौक सुशोभीकरण व सभागृहासाठी प्रत्येकी 50 लक्ष,सुरेश बंडगर यांच्या प्रयत्नांना यश

124

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.31डिसेंबर):-शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक सुशोभीकरण व सभागृह साठी प्रत्येकी 50 लक्ष रुपये चा निधी साठी भाजपा जिल्हाउपाध्यक्ष सुरेश बंडगर यांच्या प्रयत्नाला यश मिळाले असून आमदार गोपीचंद पडळकर यांनी निधी मंजूर करून घेतला असल्याचे सांगितले.
शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक सुशोभीकरणासाठी 50 लक्ष रुपये व तहसील कार्यालय जवळील अहिल्यादेवी होळकर सभागृह बांधकाम व सुशोभीकरणासाठी 50 लक्ष रुपये असा एकूण एक कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केला असल्याचे पत्र सुरेश बंडगर यांना प्राप्त झाले आहे.

बंडगर यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून धनगर समाजासाठी सभागृह व चौकाच्या सुशोभीकरण साठी वेळोवेळी निवेदने देऊन निधीची मागणी केली होती यावरून हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध ठिकाणी अहिल्यादेवी होळकर चौक सुशोभीकरण सभागृह बांधकाम व सुशोभीकरण यासाठी निधी मंजूर केला आहे यात गंगाखेड येथे एक कोटी रुपयाचा निधी राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक व सभागृहासाठी मंजूर केला असल्याने गंगाखेड येथील धनगर समाज बांधवांच्या वतीने जल्लोष करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here