
🔸वैभवजी गीते साहेबांच्या तीन वर्षांच्या पाठपुराव्याला ऐतिहासिक यश
✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मुंबई(दि.30डिसेंबर):- अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतीबंधक) अधीनियम 1989 नियम 1995 च्या नियम 9(1) नुसार एट्रोसिटी एक्टच्या अंमलबजावणीसाठी मंत्रालय स्तरावर समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) यांची नियुक्ति होण्यासाठी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस (एन.डी.एम.जे) या संघटनेचे राज्य महासचिव ऍड.डॉ.केवल ऊके यांच्या मार्गदर्शनात राज्य सचिव वैभव गीते हे उच्चस्तरीय पाठपुरावा करीत होते.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले,विधानसभेचे सभापती ऍड.राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन निवेदन देऊन चर्चा केली होती.
सलग तीन वर्षाच्या अथक खडतर पाठपुराव्या नंतर शासनाने उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे सनदी अधिकारी यांची नियुक्ति समन्वय अधिकारी म्हणून केली आहे.ही नियुक्ति सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दी.22 नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णयानुसार झाली असून समन्वय अधिकारी यांची कार्ये खालील प्रमाणे आहेत.
समन्वय अधीकारी (नोडल ऑफिसर) दर तीन महीन्यानंतर खालील बाबींचा आढावा घेतील.राज्य शासनास प्राप्त होणारे सर्व समित्यांचे अहवाल.या अधिनियमांतर्गत दाखल झालेल्या प्रकरणांची सद्यस्स्थती.
अत्याचार प्रवण क्षेत्रातील कायदा व सुव्यवस्थेबाबत स्थिती.
अत्याचार पीडीत व्यक्तींना अर्थसहाय्य त्वरीत देण्याबाबत उपाययोजना करणे.अत्याचार पीडीत व्यक्ती कींवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींना रेशन,कपडे, कायदेविषयक सल्ला, प्रवास खर्च, आहार भत्ता,वाहनांची व्यवस्था करणे.
अशासकीय संस्था,अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती संरक्षण कक्ष, विविध समित्या व कायद्याअंतर्गत इतर तरतूदी अंमलात आणणारे सर्व उच्चाधीकारी यांच्या कामाचा आढावा.सुधारीत अधिनियमांच्या “प्रकरण चार-अ मध्ये नेमून दिलेले पीडीत व साक्षीदार यांच्या अधिकारांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे.इत्यादि प्रकारणांचा आढावा नोडल ऑफिसर तीन महिन्याल घेऊ शकतात.यामुळे नॅशनल दलित मुव्हमेंट फ़ॉर जस्टिस या संघटनेचे राज्य महासचिव डॉ.केवल ऊके व राज्य सचिव वैभव गिते
यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
केंद्रीय सामाजिक न्यायराज्य मंत्री रामदास आठवले
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे,आयुक्त प्रशांत नारनवरे,केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण मोरे यांचे आभार मानले आहेत.
अधिकारी असल्याने अट्रोसिटी कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करतील……प्रवीण मोरे (स्वीय सहाय्यक केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री)
