Home महाराष्ट्र सर्वव्यापी शिवराय या महाग्रंथावर रविवारी परिसंवाद

सर्वव्यापी शिवराय या महाग्रंथावर रविवारी परिसंवाद

146

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.30डिसेंबर):;विद्यमान काळात महामानवांची चरित्र अभ्यासत असताना त्यांना कोणत्या एका विचारसरणीचा चष्मा लावून न पाहता अभ्यासता वस्तुनिष्ठ पद्धतीने महामानव समजून घेऊन त्यांच्या आदर्श कार्याच्या वारश्यातून बलशाली राष्ट्रनिर्मिती करणे या भावनेतून साकारलेल्या प्रा. डॉ. कपिल राजहंस संपादित निर्मिती प्रकाशन प्रकाशित सर्वव्यापी शिवराय या तब्बल 1008 पानांच्या महाग्रंथावर रविवारी राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे परिसंवाद होतो आहे.

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ श्रीमंत कोकाटे हे या परिसंवादात प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असणार आहेत.

सध्याच्या काळामध्ये समाज माध्यमांवरील अपुऱ्या माहितीमुळे वेगवेगळ्या महामानवांच्या बद्दलच्या वेगवेगळ्या चर्चा सुरू असतात, मात्र या सर्वांच्या पलीकडे जाऊन त्या महामानवांनी समाजासाठी, राष्ट्र उन्नतीसाठी केलेल्या कार्याचा अभ्यास न करता स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी त्यांचा अभ्यास केला जातो, असे केल्याने सामाजिक स्वास्थ्यास बाधा पोहोचत आहे, हे सर्व टाळण्यासाठी महामानवांचे लोकोत्तर विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवावेत या उद्देशातून रयतेचे राजे श्री राजा शिवछत्रपती महाराज यांच्या व्यक्तिमत्त्वावर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून लिखाण केलेल्या सर्वव्यापी शिवराय या महाग्रंथाचे संपादन प्रा. डॉ. कपिल राजहंस यांनी केले आहे.

आजवर अनेक ग्रंथांत अनेकांनी आपापल्या सोयीचे आणि त्या त्या विचारधारा यांना प्रमाण मानणारे श्री राजा शिवछत्रपती महाराज यांचे चरित्र साकारण्याचा प्रयत्न झाला आहे, मात्र विद्यमान कालखंडात अनेकविध विचारधारा, दृष्टीकोन यांना प्रमाण मानून त्या सर्वांचे लेखन एकत्र करून हा तब्बल 1008 पानांचा महाग्रंथ साकारला आहे. कोणत्याही विचारधारेचा पुरस्कार अथवा तिरस्कार न करता वस्तुनिष्ठ पद्धतीने या शिवचरित्राची मांडणी झाली आहे.

या परिसंवादासाठी पत्रकार ताज मुल्लानी, शिवचरित्राचे अभ्यासक ऍड कृष्णा पाटील, डॉ. प्रवीण कोडोलीकर, डॉ. नंदकुमार गोंधळी, प्रा. शरद कांबळे, निलेश बनसोडे आदी मान्यवर उपस्थित राहणार असून शिवप्रेमी कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक निर्मिती प्रकाशन प्रकाशक अनिल म्हमाने व संवाद प्रकाशनाच्या प्रकाशिका डॉ. शोभा चाळके यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here