
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.29 डिसेंबर):-दिव्यदीप बहुउद्देशीय संस्था ब्रम्हपुरी या एनजीओ च्या वतीने ब्रम्हपुरी तालुक्यातील इयत्ता पाचवी मध्ये नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तीन महिने मोफत टेस्ट सिरीज चे आयोजन आणि प्रवेश परीक्षा संबंधी मार्गदर्शन करण्याचे संस्थेतर्फे नियोजित करण्यात आलेले आहे.
नवीन वर्षाच्या पर्वावर 1 जानेवारी 2023 पासून सलग तीन महिने टेस्ट सिरीज चे पेपर दर रविवारी सकाळी 08.00 ते 10.00 या वेळात घेण्यात येतील.तसेच पेपर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना झालेला पेपर लगेच समजावून देण्यात येईल व प्रवेश परीक्षा संबंधी पूरक मार्गदर्शन करण्यात येईल.
नाव नोंदणी करण्यासाठी व अधिक माहितीकरिता खालील क्रमांकावर संपर्क साधावा. डॉ. स्निग्धा कांबळे (अध्यक्ष) 9405474220, सतिश डांगे ( सचिव )9421856264, वैकुंठ टेंभुर्णे (कोषाध्यक्ष) 9765101705 . करिता या परीक्षेची तयारी करणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आलेले आहे.
