Home बीड रोहिणी माने,रंजना सानप, शिवाजी झेंडेकर,अयुब पठाण यांना राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार 2023 जाहीर

रोहिणी माने,रंजना सानप, शिवाजी झेंडेकर,अयुब पठाण यांना राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार 2023 जाहीर

110

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)

बीड(दि.28डिसेंबर):-राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार सोहळा 2023 बीड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.3 जानेवारी 2023 रोजी दुपारी 12:30 वाजता भव्य दिव्य असा राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार होणार आहे.या वर्षीचा राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार 2023 रोहिणी माने,रंजना सानप,शिवाजी झेंडेकर , आयुब पठाण यांना जाहीर करण्यात आला आहे.करिता त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

सौ.रोहिणी गणेश माने यांनी रयत सामाजिक प्रतिष्ठान माध्यमातून अनेक गोरगरीब गरजूंना कॉरोना काळात खिचडी, सेनितायाजर, मास्क मोफत वाटप केले आहे. आरोग्य शिबीर, झाडे लागवड, असे सामाजिक कार्य केलेले आहे. सौ. रंजना श्रीमंत सानप ह्या प्राथमिक शिक्षक असून त्यांनी अकांत कादंबरी, निशब्द काव्यसंग्रह,रानफुले बालकथा संग्रह , लिहिलेले आहे. आणि आता पळवाटा ग्रामीण कथा संग्रह , विवीध वृत्त मानपत्र,मासिके, दिवापावली अंकात त्यांचे लेखन कार्य चालु असते. विवीध शाळेत , महीला मेळाव्यात मार्गदर्शन करतात. आज पर्यंत त्यांना 22 पुरस्कार मिळालेत.शिवाजी झेंडेकर सर हे गेवराई येथील रहिवाशी असून ते प्राथमिक जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत.

त्यांनी त्यांच्या शाळेत सुसज्ज प्रयोगशाळा,एस्त्रोनोमित क्लब,वर्ल्ड लाईफ क्लब, सुसज्ज वाचनालय, चालु केले आहे. पाच वर्षा पूर्वी संघर्ष धान्य बँक हा एक अभिनव उपक्रम राबविला जात आहे. त्यांनी आत्ता पर्यंत 700 किंटल धान्य व पाच लक्ष रुपयांचा किराणा वाटप केला आहे. आयुब पठाण यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी नगर परिषदे मधे सर्व्ह करून गरिबांना रमाई घरकूल मिळवून योजना माहिती देऊन लाभ दिले आहे. अनेक लोकांना रोजगार मिळवून दिला आहे.प्रकारे विविध पद्धतीने केलेल्या त्यांच्या समाज कार्याची दखल घेऊन पुरोगामी पत्रकार संघाचे प्रदेश संघटक भगवत वैद्य यांनी राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार 2023 चा देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी मंत्री प्रा.सुरेश (अण्णा) नवले पाटील,कार्यक्रमाचे अध्यक्ष फारुख पटेल (माजी उपनगराध्यक्ष, न. प.बीड), जिल्हा पोलिस अधीक्षक ठाकूर साहेब,संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी ,संतोष जाधव राज्य अध्यक्ष ,अजित पवार बीड जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी ,बीड जिल्हा अप्पर जिल्हाधिकारी उत्तमराव पाटील , संजय मस्के जिल्हा ग्रंथालय अधिकारी साहेब, देशमुख बीड. जिल्हा पुरवठा अधिकारी साहेब,कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.1 तोंडे साहेब, मार्कंडेय साहेब सां.बा. विभाग क्र.2 बीड,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुरेश साबळे साहेब, बीड जिल्हा पोलिस अप्पर अधीक्षक सचिन पांडकर साहेब,विलास भोईटे अधीक्षक बीड जिल्हा कारागृह , इम्रान हाश्मी सा.आयुक्त अन्न व औषध प्रशासन बीड,बीड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ गित्ते, जिल्हा जल संधरान अधिकारी परांडे साहेब जायकवाडी,देशमुख साहेब प्रभारी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक साहेब, माजी मंत्री बदामराव पंडित, ,रणजित शिरसगर कॉन्ट्रॅक्टर, निकम कार्यकारी अभियंता विद्युत महावितरण कंपनी, शिंदे सा. आयुक्त समाज कल्याण , बिजेंद्र झा. एल. डी. एम. , आर. पी. आय.बीड जिल्हा किशोर कागदे ,अमर नाईकनवडे शिव सेना सभापती न. पा.बीड, नगरसेवक शुभम धुत,वसंत मुंडे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,सुभाष चौरे बीड जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र पत्रकार परिषद, अँड.प्रकाश कवठेकर जिल्हा परिषद सदस्य,मराठवाडा अध्यक्ष वैभव स्वामी,महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्यार्थ्यां वस्तीगृह प्रदेश अध्यक्ष दिनेश लाला पवार, बीड तहसीलदार सुहास हजारे,आर. एफ. ओ. अशोक काकडे ,सुहासिनी देशमुख क्रीडा अधिकारी ,खरात जिल्हा ग्रामोद्योग केंद्र बीड,राजूशेठ
बंब माजी अध्यक्ष रोटरी क्लब बीड,ज्ञानेश्वर बागुल राज्य उपाध्यक्ष,सुभाष बिंदवाल राष्ट्रीय सल्लागार,सुनिता तौमर राष्ट्रीय अध्यक्ष महिला , महाराष्ट्र राज्य, पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य),विजय दादा पोकळे सी. एम. डी. महीला विकास संघ महाराष्ट्र राज्य, शिवराज बांगर सामाजिक कार्यकर्ते ,अलीम पटेल आर.सी.सी.बांधकाम कामगार नेते, मोमिंद्दिन शेख बांधकाम कामगार नेते, अमर्जन पठाण, बीड जिल्हा कार्यकारणी तील पदाधिकारी यांच्या हस्ते राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार देणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here