Home महाराष्ट्र श्री.सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळातर्फे ” ग्राम सफाई अभियान ” सुरूच

श्री.सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळातर्फे ” ग्राम सफाई अभियान ” सुरूच

117

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.27डिसेंबर):- सोमवार रोजी श्री.सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळ व जेष्ठ नागरिक संघ याच्या तर्फे चालु असलेल्या दर सोमवार रोजी तसेच आज २६ डिसेंबर २०२२ सोमवार रोजी श्री. सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळ व नगर परिषद घुग्घुस यांच्या संयुक्त विद्यमानाने श्रमदान मोहीम राबविण्यात आली. सदर मोहिमेअंतर्गत आठवड़ी बाजार ते गुरुदेव सेवा मंदिर पर्यंत श्रमदान करण्यात आले व आपला परिसर स्वच्छ ठेवण्याकरिता जनजागृती करण्यात आली तसेच स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.

श्रमदान मोहीमेमध्ये नगर परिषदेचे आरोग्य विभागातील कर्मचारी व श्री. सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळ घुग्घुस मधील समासेवक, ज्येष्ठ नागरिकांनी उत्सफुर्त सहभाग घेतला असून सर्व नागरिकांनी आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याकरिता, आपलं घर आणि परिसर स्वच्छ ठेवा, प्लास्टिकचा वापर टाळा असे मुख्याधिकारी यांनी आवाहन केले आहे.

यावेळी श्री.सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळ अध्यक्ष श्री.मधुकर मालेकर, सचिव संजय भोंगळे,उपाध्यक्ष गंगाराम बोबडे, बालाजी धोबे, शामराव कांबळे, नंदुभाऊ ठेंगणे, लक्ष्मणराव ठाकरे, वासुदेव ठाकरे, सोनबाजी बदखल, श्री.जनाबाई निमकर व नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here