Home महाराष्ट्र भेंडाळा गावातील भूषण नंदगीरवार याची अखिल भारतीय योग स्पर्धेसाठी निवड

भेंडाळा गावातील भूषण नंदगीरवार याची अखिल भारतीय योग स्पर्धेसाठी निवड

87

✒️चामोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

चामोर्शी(दि.26डिसेंबर):-स्थानिक केवळरामजी हरडे वाणिज्य महाविद्यालयात बीकॉम प्रथम वर्षात शिकत असलेला भूषण नंदगीरवार याची भुवनेश्वर किट विद्यापीठात दिनांक 26 ते 29 डिसेंबर दरम्यान होणारी अखिल भारतीय योग स्पर्धेसाठी गोंडवाना विद्यापीठ योग संघात निवड झाली आहे .केवळरामजी हरडे वाणिज्य महाविद्यालयात योग प्रशिक्षक प्रा डॉ महेश जोशी यांच्या प्रशिक्षणात आज पर्यंत विविध विद्यार्थ्यांनी योग स्पर्धेत प्राविण्य मिळविलेले आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाचा मुले व मुलींचा संघ 24 डिसेंबर ला प्रा डॉ महेश जोशी आणि प्रा संतोष शर्मा यांच्या सह ओडीशा राज्यातील भुवनेश्वर येथे सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहे .

भुषण नंदगीरवार याच्या अखिल भारतीय योगासन स्पर्धेतील सहभागा मुळे चामोर्शी परिसरातील विद्यार्थ्यांना मध्ये योग खेळाचा प्रचार प्रसार होण्यास मदत मिळेल असा विश्वास प्रशिक्षक प्रा डॉ महेश जोशी यांनी व्यक्त केला.भुषण याच्या या उपलब्धी बद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ हिराजी बनपूरकर तसेच संस्थेचे अध्यक्ष अरुणभाऊ हरडे ,सचिव सौ डॉ स्नेहा हरडे आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here