Home महाराष्ट्र लोकांच्या विश्वासास पात्र राहून प्रामाणिकपणे काम करा

लोकांच्या विश्वासास पात्र राहून प्रामाणिकपणे काम करा

107

🔸आ.डॉ.गुट्टे यांचे नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांना आवाहन

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.25डिसेंबर):-गावातले राजकारण फार विशिष्ट असते. त्याचा अंदाज लावता येत नाही. उमेदवाराचा सर्व बाजूने विचार करुन ग्रामस्थ निवडणूक देत असतात. त्यामुळे लोकांच्या विश्वासास पात्र राहून काम करा. विकास कामात काही अडचणी आल्या तर मी सदैव तुमच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय आ.डॉ.गुट्टे यांनी नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांना दिली.गंगाखेड तालुक्यातील आ.डॉ.गुट्टे समर्थक नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा सत्कार शहरातील राम-सीता सदन येथे आ.डॉ.गुट्टे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष गणेशराव दादा रोकडे, मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, रासप जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, विधानसभा अध्यक्ष कृष्णाजी सोळंके, तालुकाध्यक्ष रामप्रसाद सातपुते, रासप शहराध्यक्ष धनंजय भेंडेकर, मित्रमंडळाचे युवा तालुकाध्यक्ष बालासाहेब लटपटे, रासप तालुकाध्यक्ष शेषराव सलगर, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष सचिन नाव्हेकर, राजेभाऊ सातपुते, महेश आप्पा शेटे, भास्कर ठवरे, उद्धवराव चोरघडे, प्रल्हादराव शिंदे उपस्थित होते.

पुढे बोलताना आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, लोकांनी प्रस्थापितांना बाजूला केल्यामुळे विधानसभेतील ३६ पैकी २६ ग्रामपंचायत आपल्या ताब्यात आल्या आहेत. म्हणजे सार्वागिण विकासासाठी मतदारांनी आपल्याला कौल दिला आहे. त्यामुळे लोकांच्या विश्वासाला तडा जाईल असे कोणतेही वर्तन करु नका. सतत लोकांच्या संपर्कात राहा. त्याच्या सुख-दु:खात सहभागी व्हा. गतिमान कारभार करा. गावात चांगली विकासकामे करा. जनतेचे प्रश्न सोडवा. गरजूंना शासकीय योजना मिळवून द्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील तर सूत्रसंचालन कवी विठ्ठल सातपुते केले. आभार प्रभाकर सातपुते यांनी मानले. यावेळी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे (काका) मित्रमंडळ व राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व पदधिकारी यांच्यासह तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत
या ‘गावकारभाऱ्यांचा’ झाला सत्कार…

भांबरवाडीचे सरपंच उत्तम भांबरे सदस्य एकनाथ गेजगे, दिलीप होरजुळे, पिराजी देवकते, देवराव भांबुरे, गोविंद भांबुरे, विलास भांबुरे, किसन भांबुरे, मसनेरवाडीचे सरपंच राम भिसे, पॅनल प्रमुख बाबुराव भिसे, राजुशेठ गुंडाळे, सदस्य गोविंद भिसे, भारत मुदगीरे, परसराम भिसे, बेलवाडीचे सरपंच तुकाराम खांडेकर सदस्य मंचकराव घोगरे, दादाराव नंदेवाड, रंगनाथ फुटले, शेषेराव सलगर, मंचकराव राठोड, साहेबराव राठोड, वसंत राठोड, नागठाणा सरपंच मनोहर कदम, भास्कर भडके, विष्णु ढोरे, वैजनाथ भडके, रावण लखारे, रामराव कदम, गणेश भिसे, चिलगरवाडी सरपंच मुंजा खांडेकर सदस्य समाधान चिलगर, महेंद्र चिलगर, बापूराव हाके मगरध्वज चिलगर, अर्जुन चिलगर, कल्याण चिलगर, शाम चिलगर, संजय चिलगर, घटंग्रा सरपंच खंडू मिरगेवाड सदस्य सुभाष पवार, सुग्रीव पवार, संभुदेव इमडे, ज्ञानोबा इमडे, प्रविण गायकवाड, वसंत क्षिरसागर, केशव चव्हाण, सुरेश चव्हाण, महातपुरी सरपंच प्रल्हादराव शिंदे, सदस्य प्रदिप शिंदे, किरण चापके, जानकीराम वाळवटे, प्रकाश कांबळे, रामेश्वर भोळे, विठ्ठल चव्हाण, बाळु राठोड, शेख इरफान, विश्वनाथ डबडे, पिंपरी सरपंच भारतराव भिसे, पॅनल प्रमुख अच्युत काका भिसे, सदस्य कुंडलिक भिसे, सारंग भिसे, सोपान भोरपे, पांडूरंग भिसे, बाबासाहेब कांबळे, बालासाहेब मात्रे, रुमणा ग्रामपंचायत सदस्य माधव सोळंके, केशव सोळंके, राजगुरू सोळंके, प्रदीप कोडगारे, सोपान होतमणे, राजेभाऊ गोरवे, शंकरवाडी-दत्तवाडी-गोविंदवाडी ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच किशन मुलगीर, सदस्य पुंडलिक काळे, राम चव्हाण, सोपान देवकते, दत्ता उंदरे, विजय देवकते, गणपती देवकते, राजेश राठोड, डोंगरजवळा सरपंच दयानंद घरजाळे आणि सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here