Home महाराष्ट्र महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे साने गुरुजी जयंती साजरी

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे साने गुरुजी जयंती साजरी

69

🔸साने गुरुजींचे जीवन प्रेरणादायी व संस्कारक्षम – एस.व्ही.आढावे

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)

धरणगांव(दि.२४ डिसेंबर):-२०२२ शनिवार रोजी सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे साने गुरुजी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या प्रार्थनेचे सामूहिक गायन करून झाली. प्रास्ताविक एस.एन.कोळी यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार होते. नूतन प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक अतुल सूर्यवंशी यांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.शाळेचे तंत्रस्नेही शिक्षक एस.व्ही.आढावे यांनी गुरूंजीचा जीवन संघर्ष सांगून वेगवेगळे उदाहरण दाखले देऊन माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे व मानवता धर्म जोपासावा. श्यामची आई पुस्तकाचे लेखन, प्रताप हायस्कूलच्या आठवणी सांगितल्या.

शाळेतील उपशिक्षक पी.डी.पाटील यांनी साने गुरुजी यांचा थोडक्यात जीवन परिचय सांगून प्रयत्नांचे फळ ही छोटीशी एक प्रेरणादायी बोधकथा सांगितली. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष जे.एस.पवार यांनी गुरुजींचे लहानपणीचे उदाहरण सांगितले. जसे ओल्या पायाला घाण लागते तर पाय खराब होतात तसं मनाला घाण कचरा नका लागू देऊ व मन स्वच्छ व निर्मळ ठेवा, व सर्वांना सोबत घेऊन प्रवाहात आणण्याचं काम केले. ससा – कासवाची प्रेरणादायी बोधकथा सांगितली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.एन.कोळी तर आभार एच.डी.माळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू-भगिनी कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here